पोटातलं ओठात

गजू तायडे

Apr 28,2019 12:08:00 AM IST

‘आले का रे सगळे? कॅमेरा, फ्लॅश, रिफ्लेक्टर, ट्रायपॉड, सगळं नीट आणलंत ना? गुड! आई, जरा इकडे बसा बघू. या सोफ्यावर.’
‘बरं. आता?’
‘अंऽऽऽ नको. त्यापेक्षा या दिवाणावर बसून बघा.’
‘घे बाबा, बसले दिवाणावर.’
‘अंहं. असं कॅमेऱ्याकडे नाही बघायचं.’
‘म्हणजे काय? फोटो काढताना कॅमेऱ्याकडेच बघायचं असतं ना?’
‘अहो, हा तसा फोटो नाही. वेगळा आहे. आता ट्रायल घेऊ या. त्या समोरच्या भिंतीकडे बघा आणि दोन्ही हात वर करा. आशीर्वाद दिल्यासारखे.’
‘भिंतीला आशीर्वाद द्यायचा?’
‘मेक बिलिव्ह, मेक बिलिव्ह! आता हात तसेच धरून ठेवा.’
‘किती वेळ हात वर करून ठेवायचे? रग लागली ना हातांना!’
‘बस, झालंच. हं, मार रे स्नॅप!’
‘अरे, किती लखलखाट तो! डोळ्यांपुढं अंधारी आली ना माझ्या!’
‘फ्लॅशची ट्रायल घेत होतो आई. करा आता हात खाली. आता नीट अँगल साधूया. अरे केतन, आईंच्या पुढ्यात उभा राहा आणि नीट वाकून नमस्कार कर पाहू त्यांना.’
‘हा कोण आणखी? मुलगा कुठाय माझा?’
‘ते व्हॅनिटीमध्ये बसलेत. मेकअप करताहेत. इकडे सगळं रेडी झालं की एंट्री घेतील, बरं का आई. हा केतन त्यांचा डमी आहे. सध्या ह्यालाच तुमचा मुलगा समजा आणि मघाशी भिंतीला दिलात तसाच ह्याला आशीर्वाद द्या. अंहं, अहं! हात वर करा. त्याच्या चेहऱ्यापासून दूर. चेहरा अजिबात झाकला जायला नको त्याचा.’
‘हे असं?’
‘ग्रेट! माइंड ब्लोइंग!! तुम्ही अगदी परफेक्ट पोज दिलीत. आता ते आले की अस्संच करायचं. पाच मिनिटांत फोटोशूट संपेल.’
‘लवकर यायला सांग रे त्याला. थकून गेलेय मी. सोसत नाही या वयात. कितींदा फोटो काढतो माझ्यासोबत! नोटाबदलीच्या रांगेतले फोटो, वाढदिवसाला मिठाई भरवतानाचे फोटो, न् काय काय! याच्या मातृभक्तीनं अगदी दमायला होतं रे!’

.............................{{{.............................

‘साध्वी निवडून आल्याच पाहिजेत.’
‘का रे?’’
‘का म्हणजे? निवडून आल्या की खासदार होणार ना त्या!’
‘लोकसभेची निवडणूक जिंकणारे खासदारच होतात, त्यात काय नवीन?’
‘खासदार झाल्याशिवाय मंत्री होता येतं का?’
‘त्या मंत्री होणार म्हणतोस? ग्रेट! खातं कोणतं देणार त्यांना?’
‘कोणतं म्हणजे? संरक्षण मंत्रालय!’
‘अरे पण त्यांचं क्वालिफिकेशन, योग्यता...’
‘फुल क्वालिफाइड आहेत त्या! शिवाय संरक्षणावरचा खर्च झटक्यात शून्यावर आणतील. काय विडी-काडी-चिलमीचा किरकोळ खर्च होईल तेवढाच.’
‘ते कसं बुवा?’
‘सोप्पंय, तपोबलाचं सामर्थ्य लाभलेले तेजःपुंज साधू आणि साध्व्या मोठ्या संख्येनं सीमेवर जातील. दिसला शत्रू की दे शाप, दिसला शत्रू की दे शाप. बस, काही क्षणांतच शत्रू नष्ट! केवढा खर्च वाचेल बघ. शिवाय जीवितहानीदेखील होणार नाही.’
‘हे बाकी पटण्यासारखं आहे. पण मग सैन्याचं काय करायचं?’
‘काय करायचं म्हणजे? सैन्यालापण दीक्षा द्यायची, त्यांनाही तेजःपुंज साधू-साध्व्या बनवायचं!’

.............................{{{.............................

‘जरा ती शिडी आणतेस का?’
‘कशाला?’
‘माळ्यावर आजोबांची व्हीलचेअर पडलीय ना, ती काढायचीय.’
‘व्हीलचेअरचं काय करायचंय तुम्हाला?’
‘उद्या मतदान आहे ना? म्हणून.’
‘मतदानाचा आणि व्हीलचेअरचा काय संबंध?’
‘मी उद्या मतदानासाठी व्हीलचेअरवर बसून जाणार आहे. आणि तू मागून व्हीलचेअर ढकलायची.’
‘का? तुम्हाला काय धाड भरलीय? आणि मी नाही ढकलणार-बिकलणार व्हीलचेअर.’
‘छ्या बुवा. तुला काही कळतच नाही. अगं, तुझा न् माझा दोघांचाही पेपरांत फोटो आला पाहिजे, टीव्हीवर दिसलो पाहिजे आपण. नेहमी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी कोणाचे फोटो दाखवतात?’
‘कोणाचे?’
‘हॉस्पिटलातून स्ट्रेचरवर येऊन, नाही तर थेट लग्नाच्या बोहल्यावरून येऊन मतदान करणारे, शिवाय प्रेग्नंट बायका, जख्ख म्हातारे लोक, नटनट्या, सेलिब्रिटी, अशांचेच फोटो येतात ना?’‘आत्ता आलं लक्षात! असं म्हणताय तर ढकलेन मी व्हीलचेअर. ही घ्या शिडी. काढा ती. कॉलिन्सचा स्प्रे मारून

गजू तायडे

[email protected]

X
COMMENT