आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्ये प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधीच सट्टा बाजारात या पक्षाला आघाडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - मध्ये प्रदेशमध्ये 28 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. आता येथील नागिरकांना मतमोजणीच्या तारखेचे वेध लागले आहेत. मध्य प्रदेशमधील सक्रीय असलेले राजकीय पक्ष आपापल्या एकत्रित आकड्यांच्या आधारावर विजचाचा दावा करत आहेत. त्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. याठिकाणी भाजपा आणि काँग्रेस यांच्यात लढा राहणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. पण विशेष बाब अशी आहे की, काही लोकांची नजर ही सट्टा बाजारावर आहे. बुधवारी मतदान पार पडल्यानंतर गुरूवारी सट्टे बाजारात काँग्रेसच्या आघाडीवर मोठ्या प्रमाणात सट्टा लावण्यात येत होता. पण अचानक शुक्रवारी रात्रीपासून बाजाराने पलटी मारली. आता या बाजारात भाजपाच्या आघाडीवर सट्टा लावण्यात येत आहे.  
 

भाजपाच्या आघाडीने बाजार चकित झाला
> मतदानाच्या रात्रीपासून ते गुरूवारी सकाळपर्यंत काँग्रेसच्या विजयाने सट्टा बाजारात आपली आघाडी ठेवली होती. तेव्हापासून काँग्रेसच्या विजयावर जास्त पैसा लावण्यात येत होता. त्यावेळी भाजपाला 96/98 जागांची आणि काँग्रेसला 120/122 जागांची आघाडी सट्टा बाजारात मिळत होती. पण शुक्रवारपासून सट्टा बाजाराने भाजपाला 110 ते 115 आणि काँग्रेसला 100-105 जागा मिळण्यावर भाव दिला जात आहे. म्हणजेच सट्टा बाजाराच्या मते, मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिवराज यांच्या नेतृत्वात भाजपा चौथ्यांदा आपली सत्ता स्थापन करणार आहे. तर काँग्रेसला मागच्या वेळेसारखे यावेळीही विरोधी पक्षावर समाधान मानावे लागणार आहे. 


उमेदवारांचा सट्टा बाजारावर अविश्वास
> सुत्रांच्या मते, मध्ये प्रदेशात सर्वात मोठा सट्टा बाजार राज्याची आर्थिक राजधानी इंदूरमध्ये आहे. पण येथील लोकांचे म्हणणे आहे की, इंदूर विधानसभा 02 आणि 04 वर सट्टा लावल्या जात नाहीये. याचाच अर्थ सट्टा बाजारात रमेश मेंदोलो आणि मालिनी गौर यांना विजयी उमेदवार मानले जात आहे. पण खुद्द उमेदवारांचा या सट्टा बाजारावर विश्वास नाहीये. त्यांचे म्हणणे आहे की, कोणता पक्ष किंवा उमेदवार विजयी होणार हे जनतेच्या हातात आहे. तसही अवैध असणाऱ्या सट्टा बाजारावर विश्वास कसा ठेवू शकतो. 

 

बातम्या आणखी आहेत...