Home | Sports | From The Field | gamtam gambhir clarify for his criticism

खांद्याची दुखापत घेऊनच विश्वकरंडक स्पर्धेत खेळलो, तेव्हा कोणी नाही काही बोलले - गंभीर

Agency | Update - May 27, 2011, 04:56 PM IST

भारतीय संघाचा फलंदाज गौतम गंभीरवर देशापेक्षा आयपीएलमध्ये खेळण्यास महत्त्व दिल्याचे आरोप होत असताना गंभीरने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

  • gamtam gambhir clarify for his criticism

    gam_258नवी दिल्ली - भारतीय संघाचा फलंदाज गौतम गंभीरवर देशापेक्षा आयपीएलमध्ये खेळण्यास महत्त्व दिल्याचे आरोप होत असताना गंभीरने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत मी हिच दुखापत घेऊन खेळलो होतो. तेव्हा कोणी माझ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले नव्हेत, मग आताच का अशी सडेतोड भूमिका गंभीरने व्यक्त केली आहे.

    गंभीर म्हणाला, मी देशाकडून खेळण्यास कायमच प्राधान्य दिले आहे. मला माहित नव्हते की माझी दुखापत एवढी गंभीर असेल. या दुखापतीकडे दुर्लक्ष करून मी विश्वकरंडक स्पर्धेत खेळलो. सामन्यादरम्यान अनेकवेळा आपल्याला दुखापत होण्याची शक्यता असते.दुखापत असताना देशाकडून खेळलो तर कोणी काही म्हणत नाही आणि क्लब़कडून खेळल्यास लगेच टीका करण्यास सुरवात होते. प्रत्येक खेळाडूला आपल्याला दुखापत व्हावी असे वाटत नाही. आयपीएलमध्ये कोलकता नाईट रायडर्स संघाच्या कर्णधार म्हणून खेळणे मला आवश्यक होते.    उत्तेजक द्रव घेतल्याने गंभीर अडचणीत; कारवाई होणार

    देशापेक्षा आयपीएलला महत्त्व दिल्याने गंभीरच्या कर्णधारपदावर टांगती तलवारTrending