social / २५ लाखांच्या नोटांचे बाप्पा

अकोल्याच्या वीर भगतसिंग मंडळाचे गणराय चर्चेचा विषय

नीरज भांगे/ करुणा भांडारकर

Sep 10,2019 07:47:00 AM IST

अकोला : अकोल्यातील गवळीपुरा मनकर्णा प्लॅाटस्थित वीर भगतसिंग मंडळाने यंदा २५,१०,३०० रुपयांच्या चलनी नोटांचा उपयोग करून मूर्ती साकारली आहे. १२ फूट उंच आणि ८ फूट रुंद ही गणरायाची मूर्ती चर्चेचा विषय ठरली आहे. गणेशमूर्ती संरक्षणासाठी पोलिसांचा २४ तास कडक पहारा येथे तैनात अाहे. दिव्यांग कलाकार राजेश ऊर्फ टिल्लू टावरी यांनी १५ दिवसांत मूर्तीला आकार दिला.


मूर्ती तयार करताना नोटा खराब होणार नाहीत यासाठी यू पिनद्वारे कॅन्व्हासवर नोटा जोडून गणपतीची मूर्ती तयार करण्यात आली.

नोटांचा वापर असा

नोट आणि रक्कम
500 - 11 लाख
200 - 02 लाख
100 - 07 लाख
50 - 3.5 लाख


याशिवाय १० च्या ६० हजार, २० च्या ४ ते ५ हजार नोटा आणि १ रुपयांच्या ३०० नोटांचा वापर करण्यात आला.

X
COMMENT