आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ganapatrao Deshmukh, Who Has Been Elected To MLAs 11 Times, Withdraws From The Assembly, Bhausaheb Rupanar Will Took His Place

तब्बल 11 वेळा आमदार झालेल्या गणपतराव देशमुखांची विधानसभेतून माघार, त्यांच्या जागी या नेत्याला संधी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- भाजपमध्ये सत्तरी पार केलेल्या उमेदवारांना ब्रेक दिला जातोय आहे. त्यामुळे अनेक जेष्ठ उमेदवारांना घरचा रस्ता धरावा लागत आहे. पण, याला अपवाद ठरले आहेत, ते ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख. वयाची नव्वदी पार केलेल्या या 94 वर्षीय गणपतरांवाची क्रेझ आजही सांगोला मतदारसंघात पाहायला मिळते. 
आमदार गणपतराव देशमुख यांनी तब्बल 11 वेळा आमदार होण्याचा मान मिळवत विश्वविक्रम रचला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत तब्बल 94 हजार 374 मते मिळवत त्यांनी एकहाती विजय मिळवला होता. आमदार देशमुख मागील 54 वर्षांपासून निवडून येत आहेत. ग्रिनीज वर्ल्डबुकमध्ये नाव नोंदवलेले आमदार गणपतराव देशमुख यावेळेस विधानसभा लढवणार नव्हते. त्यांच्या विधानसभेच्या जागेसाठी आज जी बैठक झाली त्यामध्ये उद्योगपती व फॅबटॅक ग्रुपचे मालक भाऊसाहेब रुपनर यांच्या नावावर शिकामोर्तब करण्यात आला.
गणपतराव देशमुख यांचे चिरंजीव चंद्रकांत देशमुख हेसुद्धा या जागेसाठी इच्छुक होते. पण, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी 5 इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. या मुलाखतीनंतर काही वेळातच भाऊसाहेब रुपनर यांचे नाव घोषित करण्यात आले. गणपतराव देशमुखांचे राजकीय वारसदार म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे भाऊसाहेब रुपनर हे सांगोला विधानसभा निवडणूक लढणार आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या युतीमध्ये जाताना सांगोल्याची जागा शेकापला सोडली जाईल अशी माहिती गणपतराव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...