Home | National | Other State | Gandhi Family in South India : After the Indira Gandhi fight, the seats rose, after Soniya seats decreased now its Rahul's turn

दक्षिणेत गांधी परिवार : इंदिरा गांधी लढल्यावर जागा वाढल्या, सोनियांनंतर कमी झाल्या; आता राहुलकडे चेंडू

भास्कर रिसर्च | Update - Apr 14, 2019, 10:21 AM IST

केरळमधील वायनाडमधून राहुल गांधी मैदानात, लक्ष दक्षिण भारतातील ६ राज्यांतील १५० जागांवर

 • Gandhi Family in South India : After the Indira Gandhi fight, the seats rose, after Soniya seats decreased now its Rahul's turn

  गांधी परिवारातील एखादा सदस्य प्रथमच दक्षिण भारतातून निवडणूक लढवत नाही. राहुल यांच्यापूर्वी साेनिया व इंदिरा दक्षिण भारतातून लढल्या. इंदिरा गांधी दक्षिणेतून लढल्यानंतर पाचपैकी चार राज्यांत काँग्रेसला फायदा झाला. साेनिया बेल्लारीतून लढल्या तेव्हा फक्त कर्नाटक व तामिळनाडूत फायदा झाला. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, केरळ आणि ओडिशा या सहा राज्यांत लोकसभेचे १५० मतदारसंघ आहेत.

  गांधी दक्षिणेतून उतरल्यानंतर कसे बदलले निवडणूक गणित

  इंदिरा दक्षिणेतून लढल्यानंतर पाचपैकी चार राज्यांत फायदा

  > इंदिरा- चिकमंगलूर (1978), मेदक (1980)

  1980 मध्ये इंदिरा आंध्र प्रदेशातील मेदकमधून लढल्या. तेव्हा जागा 95 (1977 मधील निवडणूक) वरून वाढून 113 झाल्या. 1977 मध्ये रायबरेलीतून पराभूत झाल्यानंतर त्या चिकमंगलूर मतदारसंघातून पोटनिवडणूक लढल्या हाेत्या. परिणाम 1980 मध्ये कर्नाटकातील सर्व 27 व आंध्र प्रदेशातील 42 पैकी 41 जागांवर विजय झाला. तामिळनाडूतील 20(+6), केरळ 5 (-6), ओडिशात 20(+16) जागा मिळाल्या.

  > सोनियांमुळे 2 राज्यांत फायदा, 2 मध्ये फटका
  सोनिया- बेल्लारी, कर्नाटक (1999) 1999 मध्ये सोनिया बेल्लारीतून लढल्या. तेव्हा दक्षिणेतून काँग्रेसच्या जागा 44 वरून 35 वर गेल्या. बेल्लारीत त्यांनी सुषमा स्वराज यांचा पराभव केला.

  परिणाम

  कर्नाटकमध्ये 18 (+9) जागा मिळाल्या. मागील निवडणुकीच्या तुलनेत आंध्रत 5(-17), तामिळनाडूत 2(+2), ओडिशात 2(-3) जागा.

  आता राहुलसमाेर दक्षिणेत जागा वाढवण्याचे आव्हान
  राहुल- वायनाड, केरळ (2019)


  केरळमध्ये एकूण 20 लोकसभेच्या जागा आहेत. त्यातील 8 मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत. राहुल यांच्यासमाेर दक्षिणेत जागा वाढवण्याचे आव्हान आहे.
  दक्षिणेत भाजप- 2014 मध्ये मोदी लाट असताना दक्षिणेत भाजपचा फायदा झाला नाही. भाजपला १५० जागांपैकी फक्त 20 जागा मिळाल्या. भाजपने 67 जागांवर उमेदवार उभे केले हाेते.

Trending