आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधी परिवाराने पदासाेबतच सत्तात्याग करावा!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँ ग्रेस संपलेली नाही, ती काेमामध्ये आहे. परंतु ती निष्प्राण बनली आहे आणि तिच्यात प्राण केव्हा परत येऊ शकताे याची आपणास कल्पना आहे. राहुल गांधींच्या राजीनाम्यामुळे सध्या काँग्रेसमध्ये हे सारे सुरू आहे. कारण त्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. (राजीनामापत्राच्या पहिल्या परिच्छेदात तरी तसे नमूद केले, उर्वरित तपशिलात मात्र इतरांवरच खापर फाेडले आहे) ही काही प्रामाणिक भूमिका नव्हे. जर तसे असते तर आतापर्यंत काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाची निवड झालेली असती. असे वाटते की, राजीनामा पदाचा हाेता, ताे सत्तेचा नव्हता. यापूर्वीदेखील गांधी परिवाराने या भूमिकेचा अंगीकार केलेला हाेता. गांधी परिवारातील सदस्यांना अशा काेणत्याही बिझनेस कार्डची गरज नसते, ज्यावर लिहिलेले असेल ‘काँग्रेस सीईआे.’ मनमाेहनसिंग पंतप्रधान असताना त्यांनी तांत्रिकदृष्ट्या सरकार चालवले हाेते. संपूर्ण १० वर्षे पडद्याआडून हा गांधी परिवार सूत्रे हलवत हाेता. पद काेणतेही नव्हते, मात्र सत्ता हाेती.

 

राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर अद्यापही भावी नेतृत्वाविषयी एखाद्या विश्वसनीय नावावर चर्चा झाली नाही. यावरून एक बाब स्पष्ट हाेते की, गांधी परिवाराने व्यासपीठ तर खुले केले आहे, मात्र काठावर उभे राहून हेदेखील पहात आहे की आपली जागा बळकावण्याची हिंमत काेणाची आहे. जर काेणी तसा प्रयत्न केला तर त्यास गांधी परिवारासाठी धाेकादायक मानले जाईल आणि ब्लॅकलिस्टमध्ये टाकले जाईल. या वेळी मला अशा पालकांची आठवण हाेते, जे आपल्या मुलांना म्हणतात ‘ठीक आहे, जा टीव्ही पाहा, मला काही त्याची पर्वा नाही, मी घर साेडून चाललाेय.’ वस्तुत: पालक बाहेर खिडकीजवळ उभे राहून पाहत असतात आणि जाे टीव्ही सुरू करेल त्याची नंतर धुलाई करतात.

 


अर्थात, या घटनेचा देशाच्या भवितव्यावर काही परिणाम हाेणार नसता तर हे सारे मजेशीर ठरले असते. गांधी परिवारातील सदस्य स्वत:कडे पाहत आहेत, केवळ स्वत:कडे. हे सारे राष्ट्रासाठी आहे, आपल्या पक्षासाठीदेखील नाही. त्यांना अपेक्षा आहे की, पक्षाध्यक्षपद स्वीकारण्यासाठी गळ घातली जाईल, लाेक याचना करतील. त्यांना असेही वाटते की, देशातील राजकीय परिस्थिती बदलेल, भारतीयांचे मन परिवर्तन हाेईल. लाेक पुन्हा काँग्रेसचे स्वागत करतील. कारण भूतकाळातदेखील असेच घडलेले आहे. खरे तर काेणीही भविष्याचा वेध घेऊ शकत नाही, परंतु गांधी परिवाराचा पुनरुद्धार हाेण्याची शक्यता दिसत नाही.  मात्र हे निश्चित की काँग्रेसचे स्वत:चे भवितव्य आहे. जगातील साऱ्या लाेकशाही देशात विभिन्न विचारप्रवाहाच्या पक्षांची गरज असते, त्यालाच तर लाेकशाही म्हणतात.

 


दुसरीकडे गांधी परिवार दिवसेंदिवस लोकप्रियता गमावत आहे. यामागील कारणांचे विश्लेषण करणे हा लेखाचा उद्देश नाही. या कुटुंबाने नव्या भारताशी नातेच तोडले आहे, नम्रपणा, पश्चात्ताप किंवा बदलण्याची इच्छा दाखवण्यास हा पक्ष तयार नाही, हीच यामागील कारणे. हा स्वभाव मुळात प्रतिभाविरोधी व लबाडीला प्रोत्साहन देणारा आहे. पंतप्रधानपदाचे त्यांचे पर्याय भारतीय तरुणांना आकर्षित करत नाही. यात फार काही चुकीचे नाही. नेत्यांचा अशा लोकांपासून संपर्क तुटतो. एखादा पक्ष कुटुंबापेक्षा खूप मोठा असतो. ही किमान अपेक्षा असते. पण इथे अपवाद आहे. 

 


खोटा राजीनामा, ज्यात पद सोडले पण सत्ता नाही सोडली. एखाद्या प्रतिभावान, प्रभावी अथवा स्वतंत्र विचारसरणीने काम करणाऱ्या व्यक्तीची या पदी नियुक्ती करण्यासाठी काही पावलेही उचलली जात नाहीत. यावरून पक्षाला गोष्टी सावरायच्याच नाहीत, हे स्पष्ट दिसते. याचा पक्षावर व पर्यायाने भारताच्या लोकशाहीवर खूप मोठा परिणाम होईल. एखाद्या शरीराचे एक-एक करत सर्व अवयव कापले जात आहेत व शीर्षस्थानी असलेला मेंदू मात्र यावर उपाय शोधत नाही, अशीच स्थिती काँग्रेसची झाली आहे. गोवा व कर्नाटकात हेच झाले. काँग्रेसचे आमदार एकगठ्ठा राजीनामे देत आहेत. काँग्रेसमध्ये उरलेल्या थोड्याफार विश्वासू नेत्यांपैकी एक कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी अध्यक्षपदी तरुणाला विराजमान करावे, असा सल्ला दिला आहे. मी अनौपचारिकरीत्या ट्विटरवर एक जनमत चाचणी घेतली. यात सुमारे ४६ हजार लोकांनी यात आपली मते नोंदवली. त्यात ८६ टक्के लोकांनी अनुभवी व्यक्तीऐवजी सचिन पायलट यांच्यासारख्या तरुण अध्यक्षाला संधी देण्याचे म्हटले आहे. तरीही काँग्रेस हलण्यास तयार नाही.

 
या सर्वात काँग्रेसचे नुकसान मोठे असून हा लोकशाहीचाही क्षय आहे. भाजपचे कट्टर प्रशंसकही मान्य करतील की, भारतीय लोकशाहीसाठी थोडा-फार मजबूत विरोधी पक्ष हवाच! गांधी परिवार व काँग्रेस नेहमीच भाजपला लोकशाहीची पायमल्ली करण्यासाठी दोषी ठरवतो, पण लोकशाहीला योग्य दिशा दाखवण्यात स्वत:ची जबाबदारी काँग्रेसच पार पाडत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. 

 


आपण देशावर प्रेम करतो, सिद्ध करता येत नसले तरी स्वातंत्र्य व लोकशाहीवर आमचे प्रेम आहे. भारताचा क्षय होताना पाहणे व तेदेखील काही लोकांचे नाट्य, तोंड फिरवणे, योग्य तो निर्णय न घेतल्याने असे घडणे, हे दु:खद आहे. काँँग्रेसमधीलच एखाद्या व्यक्तीकडे अध्यक्षपद द्या. केवळ स्वत: राजीनामा देऊ नका, नवे वास्तव ओळखा... मोठ्या बदलाची वेळ येऊन ठेपली आहे.