आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधीजींची भूमिका साकारणारे चार अभिनेते सांगताहेत अनुभव, अन्नू कपूर म्हणाले- तेव्हा छोटे-मोठे रोल करायचो

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माझे मन अधिक खंबीर झाले
रजित कपूर (चित्रपट : द मेकिंग ऑफ द महात्मा
)

गांधीजींचे पात्र साकारण्यापूर्वी श्याम बेनेगलजींनी मला वाचण्यासाठी गांधीजींनी लिहिलेले 'माय एक्स्पीरिमेंट विथ ट्रुथ' हे पुस्तक दिले. हे पुस्तक माझ्यासाठी एक प्रकारे भगवद्गीता बनले आहे. ते वाच आणि समजून घे, असे ते म्हणाले. मी या पुस्तकाद्वारे खूप काही शिकलो. या पुस्तकात गांधीजींच्या आयुष्यातील अनेक खासगी गोष्टी लिहिल्या आहेत. त्यापैकी चित्रपटांमध्ये काही दाखवल्या, काही दाखवल्या नाहीत.

गांधीजींचे पात्र साकारल्यानंतर माझी संकल्पशक्ती वाढली, असे मला वाटते. माझी दृढता आणखीनच वाढत गेली. मनोवृत्तीची ताकद आता जास्त दृढ व्हायला लागली आहे. कदाचित पात्र साकारण्यासोबतच त्यातील काही गोष्टी तुमच्या सदैव कामी येत राहतात.


गांधीजींचे पात्र साकारत असताना माझ्या खांद्यावर एक जबाबदारी होती. मात्र, त्या गोष्टींना ओझे समजून चाललो असतो तर योग्यरीत्या पात्र साकारू शकलो नसतो. श्याम बेनेगलजी मला म्हणाले की, असा कोणताही विचार करू नकोस. लोक तर प्रत्येक स्थितीची तुलना करतीलच. मग मी सर्व गोष्टींचा विचार आपल्या मनातून काढून टाकला.

भूमिकेची तयारी
चित्रपटात माझा पोशाख, केशभूषा इत्यादी पाच गेटअप होते. मात्र, शेवटी मला टक्कल करावे लागले तेव्हाचा क्षण आजही मी विसरू शकलेलो नाही. एकदा धोतर-कुर्ता घालून व्हॅनिटीमधून बाहेर पडत कॅमेऱ्यासमोर आलो तेव्हा मला पाहून सर्व लोक उभे राहिले. जणू गांधीजींचा आत्मा माझ्यामध्ये आल्याचा भास त्यांना झाला. कुणालाच समजले नाही.


स्वत:त बदल करणे अवघड होते
दर्शन जरीवाला (गांधी माय फा
दर)

हा चित्रपट करण्यापूर्वी 'महात्मा व्हर्सेस गांधी' नाटकामध्ये त्यांचे पात्र साकारलेले होते. याच्या दोन-तीन वर्षांनंतर 'गांधी माय फादर' चित्रपटात गांधींचे पात्र साकारण्याची संधी मिळाली. त्यामुळे खूप आनंद झाला. याची शूटिंग पुणे, महाबळेश्वर, मुंबई, अहमदाबाद, दक्षिण अाफ्रका इत्यादी ठिकाणी झाली. आम्ही पुण्यात शूटिंग करत असताना बॉम्बस्फोटाचे एक दृश्य चित्रित करायचे होते. खराखुरा स्फोट घडवून त्याचे चित्रीकरण करण्यात आले होते. तिथे युनिटचे भरपूर सदस्य होते.

गांधीजींचे पात्र साकारणे आव्हानात्मक होते. मला १८ किलो वजन कमी करावे लागले. यासाठी मी डाएटिंग केले. यामुळे शूटिंगदरम्यान काही मजेशीर प्रसंगही घडले. एकेदिवशी सकाळपासून खाल्ले नव्हते. सिंक साउंड रेकॉर्ड करण्यासाठी माझ्या पोटाजवळच लेपल माइक लावलेला होता. पोटातून येणारा गुड गुड असा आवाज त्या माइकमधून बाहेर पडत होता. हे ऐकून ऑस्कर विजेते साउंड रेकॉर्डिस्ट रसूल पुकुट्टी चिंतेत पडले.

भूमिकेची तयारी
गांधीजींच्या गेटअपमध्ये येण्यासाठी तीन तास लागले होते. प्रोस्थेटिक्सपासून ते बाल्ड विगपर्यंत करावे लागले. पडद्यावर हावभाव साकारायचे होते. त्यासाठी ट्रान्सफॉर्मेशन हे मोठे आव्हान होते. म्हणून योगासनेदेखील केले. त्यांची उंची जवळपास ५.५ इंच असावी आणि माझी उंची ५.१ इंच होती. त्यामुळे या गोष्टीही लक्षात ठेवायच्या होत्या.


बापूंच्या उशीवरच टेकवले होते डोके
अन्नू कपूर (चित्रपट : सरद
ार)

मी जेव्हा छोटे-मोठे रोल करायचो तेव्हा निर्माते केतन मेहता यांनी मला गांधीजींची भूमिका आॅफर केली. मी माझे कौशल्य दाखवले. त्यांना नाराज केले नाही. राष्ट्रपती भवनात शूटिंग केले. नालंदा सुइटमध्ये जेथे इंग्लंडचे राजकुमार चार्ल्स आणि राजकुमारी डायना थांबले होते. तेथेच मी मेकअप करत होतो. गांधीजींच्या उशीवर मीही डोके टेकवले होते. दहा हजार लोक आणि १० कॅमेऱ्यांमध्ये शूटिंग करणे सोपे नव्हते. या चित्रपटाचा अनुभव खूपच रोमांचक आणि ज्ञानवर्धक होता.

भूमिकेची तयारी : मी त्यांच्या चालण्याबाेलण्यावर लक्षा केंद्रित केले. सर्वात जास्त भाषेवर मेहनत घेतली कारण मला हिंदी आणि थोडे गुजरातीत बोलायचे होते. त्यांचे भाषण ऐकले. श' आणि 'स'च्या ध्वनीसाठी खूप मेहनत घेतली. इंग्रजीच्या डबिंगदरम्यान मी त्याच पॅटर्नचा वापर केला. दिग्दर्शकाची पत्नी माझ्याकडून योग्य इंग्रजी उच्चार करवून घेत होती. त्यामुळे मी दोन्ही सॅम्पलमध्ये डब केले. त्यांना विश्वास वाटल्यावर त्यांनी मला डब करण्याची परवानगी दिली.

अहिंसा, करुणा आणि शांतीचे खरे प्रेषित बुद्ध व महावीर होते. गांधीजींवर यांचा प्रभाव होता. सामान्य लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी कोणाची न कोणाची गरज असते. गांधीजी चांगले होते, मात्र प्रत्येक चांगल्या व्यक्तीची प्रत्येक गोष्ट देशाच्या प्रगतीसाठी कल्याणकारी ठरते हे गरजेचे नाही.

मी इतर कोणत्याही अभिनेत्यास गांधीजींची भूमिका साकारताना पाहिले नव्हते. साहित्य, छायाचित्र आणि दृकश्राव्य चित्रपटांमध्ये त्यांना उत्तम प्रकारे सादर केले गेले आहे. त्याच अभ्यासावर आधारित मी पूर्ण प्रामाणिकपणा आणि सचोटीने हे पात्र साकारले. प्रत्येक भूमिका कलाकारासाठी खूप खास असते. मी त्यातून गेले अाहे.

बातम्या आणखी आहेत...