आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) च्या विरोधात माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा आणि आणि काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी 'गांधी शांती यात्रा' यात्रेस सुरुवात केली. 3000 किमी. च्या या यात्रेस मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया येथून सुरुवात झाली. यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी या यात्रेला हिरवा झेंडा दाखवला आहे. ही यात्रा राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा येथून जात 30 जानेवारीला दिल्लीच्या राजघाट येथे समाप्त होणार आहे.
यादरम्यान यशंवत सिन्हा हे म्हणाले की, आमची यात्रा एनआरसी आणि सीएएच्या विरोधात आहे. राज्य सरकारने हिंसाचार केला त्याविरोधात आहे. वाटेत आम्ही लोकांशी बोलू. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची सुरक्षा करून. देशाची पुन्हा फाळणी होऊ देणार नाही. गांधीजींची पुन्हा हत्या होऊ देणार नाही.
गांधी शांती यात्रेदरम्यान हे दोन्ही नेते सीएए, एनआरसी आणि जज लोया यांच्या संशयास्पद मृत्यूचा मुद्दादेखील उचलणार आहेत. सोबतच, केंद्र सरकारकडे एनआरसी लागू न करण्याची मागणीही करणार आहेत. या यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि त्यांच्या पक्षातील नेतेदेखील सामील झाले आहेत.
शत्रुघ्न यांनी साधला भाजपवर निशाणा
या यात्रेबद्दल बुधवारी काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, 'जर महात्मा गांधी आणि जयप्रकाश नारायण यांसारखे महान नेते आज असते तर माहित नाही भाजपच्या ट्रोलने त्यांच्यासोबत काय केले असते. ते हेदखील म्हणाले की, 'देशहितासाठी सत्याची साथ देणारे कुणालाही निशाणा बनवणे ट्रोल्सकाही मोठी गोष्ट नाहीये उलट बिजनेस आहे. काँग्रेस नेते म्हणाले की, ट्रोल स्वतः राष्ट्र विरोधी कामे करत मात्र इतरांना राष्ट्र विरोधी म्हणतात. त्यांच्यासाठी ना ही मोठी गोष्ट आहे ना चुकीची.' ते पुढे म्हणाले, 'ज्यावेळी देशात रोजगाराची कमतरता जाणवते आहे तेव्हा रोजगार केवळ भाजपच्या वॉंर रूममधेच मिळू शकतो.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.