आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधीजींनी खूप भ्रमंती केली, लिखाण केलं.. या प्रवासातील महत्त्वाच्या चार गोष्टी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गांधीजींनी म्हटले होते,-देश भ्रमंतीत मला घाणीच्या साम्राज्यामुळे सर्वाधिक वेदना झाल्या. आपल्या गरिबीचे कारण स्वच्छतेचा अभाव आहे. यासाठी लाखो रुपये लागतात. ४० वर्षांच्या स्वातंत्र्य चळवळीत गांधीजी रोज १८ किमी चालले. यानुसार त्यांनी ७९ हजार किमी अंतर पार केले. पृथ्वीला दोन प्रदक्षिणा पूर्ण करण्याएवढे हे अंतर आहे. गांधीजींनी जीवनात सुमारे १ कोटी शब्द लिहिले. ते रोज ७०० शब्द लिहीत होते. त्यांनी लिहिलेले ५० हजार दस्तावेज सुरक्षित आहेत. ते उजव्या व डाव्या असे दोन्ही हातांनी लिहीत असत. गांधीजींना १४ वेळा अटक झाली. ६ वर्षे तुरुंगात राहिले. सर्व शिक्षा पूर्ण केल्या असत्या तर त्यांना ११ वर्षे १९ दिवस तुरुंगात राहावे लागले असते. त्यांनी १३४२ दिवस उपवास केला.  

बातम्या आणखी आहेत...