श्रीगणेशाने चंद्राला दिला / श्रीगणेशाने चंद्राला दिला होता शाप, आज रात्री जो करेल चंद्राचे दर्शन; त्यावर लागले चोरीचा खोटा आरोप

Sep 13,2018 10:24:00 AM IST

भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही गणेश चतुर्थी म्हणून साजरी करण्यात येते. या वर्षी हे पर्व 13 ऑगस्ट गुरुवारी आहे. असे म्हणतात की, या दिवशी रात्री चंद्राचे दर्शन करू नये. या रात्री चंद्र पाहिल्यास खोटे आरोप लागण्याची भीती असते. जर चुकून चंद्र पाहिला तर या मंत्राचा जप करावा...


मंत्र...
सिंह: प्रसेन मण्वधीत्सिंहो जाम्बवता हत:।
सुकुमार मा रोदीस्तव ह्येष: स्यमन्तक:।।


ज्यांना संस्कृतचे ज्ञान कमी आहे. त्यांनी मराठीत असे म्हणावे..
मंत्रार्थ- सिंहाने प्रसेनला मारले आणि सिंहाला जाम्बवंतने. हे सुकुमार बालका तू रडू नको, तुझाच आहे हा स्यमन्तक मणी.


या मंत्राच्या प्रभावाने कलंक लागत नाही. जो मनुष्य खोट्या आरोप-प्रत्यारोपात फसतो, तो या मंत्राचा जप करून आरोप मुक्त होऊ शकतो.


गणेश चतुर्थीला चंद्राचे दर्शन न करण्यासंबंधीत पुरणाणात दोन कथा आहेत. या कथा वाचण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा..

श्रीगणेशाने दिला होता चंद्राला शाप... श्रीगणेशाला गजाचे मुख लावले तेव्हा ते गजवरद झाले आणि आई-विडिलांच्या रूपात पृथ्वीची सर्वात आधी प्रदक्षिणा पुर्ण करून त्यांना अग्रपुजेचा मान मिळाला. सर्व देव-देवतांनी श्री गणेशाची स्तुती केली. परंतु, चंद्र केवळ स्मितहास्य करत होता. त्याला आपल्या सुंदर असण्यावर अभिमान होता. श्री गणेशाला समजले की, अभिमानामुळेच चंद्र त्याचा उपहास करत आहे. रागवालेल्या श्री गणेशाने चंद्राला शाप दिला की, आजपासून तु काळा होशील. चंद्राला आपली चुक लक्षात आली. त्याने श्री गणेशजींकजे क्षमा मागितली. तेव्हा गणेशजी म्हणाले, सुर्याच्या प्रकाशाने तुला हळू-हळू तुझे रूप प्राप्त होईल. परंतु, आज (भाद्रपद शुक्ल चतुर्थी) च्या दिवस तुला दंड दिल्यासाठी कायम आठवला जाईल. जी कोणी व्यक्ती आज तुझे दर्शन करेल, त्याच्यावर खोटा आरोप लागेल. त्यामुळे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल चतुर्थीला चंद्राचे दर्शन करत नाही. पुढील स्लाइडवर वाचा, श्रीकृष्णावर लागला होता चोरीचा आरोप...भगवान श्रीकृष्णावर लागला होता चोरीचा आरोप... प्राचीन काळी यादवकुळात सत्राजित नावाचा एक राजा होता. मोठी तपश्यर्या करून त्याने सुर्य देवाला प्रसन्न करून घेतले. सुर्य देवाकडून दिव्य स्यमंतक मणी मिळवला. या मण्यामुळे राजास दररोज सोने प्राप्त होत होते. त्याच्या प्रभावामुळे राज्यात साप, अग्नी, चोर इद्यादींचे संकटांचा भय संपले होते. एक दिवस सत्राजित राजा अग्रेसनच्या दरबारात आला. तेथे भगवान श्रीकृष्णही उपस्थित होते. सत्राजिताकडील स्यमंतक मण्याविषयी श्रीकृष्णाला समजल्यावर श्रीकृष्णाने सत्राजिताकडे या मण्याची मागणी केली. परंतु स्त्राजिताने तो मणी देण्यास नकार दिला. त्यानंतर एक दिवस सत्राजिताचा भाऊ प्रसेन स्यमंतक मणी गळ्यात घालून जंगलात शिकारीसाठी गेला. तेथेच एका सिंहाने हल्ला करून प्रसेनाला ठार मारले आणि दिव्यमणी पळविला. प्रसेन परत न आल्याने लोकांनी श्रीकृष्णावर शंका घेतली. कारण त्यांना तो मणी हवा होता. परतु, मणि तर सिंहाकडे होता. त्यानंतर जांबुवंत नावाच्या एका राजाने सिंहास मारुन तो स्यमंतक मणी हस्तगत केला. कृष्णाला जेव्हा आपल्यावरील आरोपांविषयी कळाले तेव्हा कृष्ण प्रसेनाच्या शोधार्थ निघाला. जंगलात कृष्ण जांबुवंताच्या गुहेपाशी येऊन स्यमंतक मणी शोधू लागला. अचानक जांबुवंतने कृष्णावर हल्ला केला. त्या दोघांचे युद्ध एकवीस दिवस चालले. शेवटी जाम्बवंताला कळाले की श्रीकृष्ण तर आपले भगवान आहे. मागच्या जन्मी ते श्रीरामाच्या रूपात आपले स्वामी होते. तेव्हा जाम्बवंतने स्वखुशीने तो मणि श्रीकृष्णाला दिला. श्रीकृष्णाने तो मणि राजा सत्राजितला परत दिला. खुश झालेल्या राजा सत्राजितने आपली कन्या सत्यभामाचा विवाह श्रीकृष्णास लावून दिला. असे म्हणतात की ही कथा ऐकल्याने आणि ऐकवल्याने भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला चुकून चंद्राचे दर्शन झाल्यास पाप लागत नाही.
X