आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून 23 सप्टेंबरपर्यंत करा या 3 पैकी कोणत्याही एक मंत्राचा जप, मिळेल धन-संपत्ती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार 13 सप्टेंबरपासून गणेश उत्सव सुरु होत आहे. श्रीगणेशाचा जन्मोत्सव 10 दिवस साजरा केला जाईल. हा काळ केवळ गणेश स्थापना आणि उत्सवाचा नाही. या काळात योग्य प्रकारे साधना केल्यास विविध लाभ प्राप्त होऊ शकतात. गणपती बुद्धीचे देवता आहेत. बुद्धीनेच लक्ष्मी प्राप्त केली जाऊ शकते. गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत काही मंत्राचा जप केल्यास श्रीगणेश कृपेने धन-संपत्ती प्राप्त होऊ शकते.


श्रीगणेशाचे मंत्र सर्वात सोपे आहेत. तुम्ही नियमितपणे गणेश उत्सव काळात या तीन मंत्रांपैकी कोणत्याही एक मंत्राचा जप केल्यास लाभ होऊ शकतो. या मंत्र जपाने श्रीगणेश प्रसन्न होतात आणि कुंडलीतील बुध ग्रहाचे शुभ प्रभाव दिसून येतात.


हे आहेत तीन मंत्र
श्री गणेशाय नमः
- हा श्रीगणेशाचा मूळमंत्र आहे.


ऊँ गं गणपतये नमः - हा श्रीगणेशाचा बीजयुक्त मंत्र आहे.


ऊँ विघ्नेश्वराय नमः - हा श्रीगणेशाचा विघ्नेश्वर मंत्र आहे. यामुळे तुमचे सर्व विघ्न दूर होऊ शकतात.


या मंत्राचा कमीत कमी 108 वेळेस जप करावा.

बातम्या आणखी आहेत...