आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईशान्य कोपऱ्यात करा श्रीगणेशाची स्थापना, पश्चिमेकडे असावे मूर्तीचे मुख, वाचा अशाच 8 गोष्टी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या वर्षी 13 सप्टेंबरला गुरुवारी गणेश चतुर्थी आहे. या दिवशी प्रत्येक घरात विघ्नहर्ता श्रीगणेशाची स्थापना होईल. यासोबतच सामूहिक मंडळांमध्येही एकदंत विराजित होतील. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार श्रीगणेशाची स्थापना करताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. या गोष्टींचे पालन केल्यास श्रीगणेशाची भक्तांवर नेहमी कृपा राहते.


1. ज्या ठिकाणी श्रीगणेश मूर्थीची स्थापना करणार आहात तेथे रोज स्वच्छता करावी. त्याठिकाणी कचरा अस्वच्छता असू नये.


2. गणेश मूर्तीची स्थापना ईशान्य दिशेला करावी. मूर्तीची मुख पश्चिम दिशेला राहील अशाप्रकारे स्थापना करावी.


3. मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्तीचीच स्थापना करा. यामुळे पर्यावरणाचे कोणत्याहीप्रकारे नुकसान होणार नाही.


4. भगवान श्रीगणेशाची रोज पूजा करावी. सकाळ-संध्याकाळ नैवेद्य दाखवून आरती करावी.


5. धर्म ग्रंथानुसार भगवान श्रीगणेशाला तुळस अर्पण करू नये. दुर्वा आणि ताजे लाल फुल अर्पण करणे उत्तम राहते.


6. गणेश मूर्ती स्थापना ठिकाणी मृतात्म्यांचे फोटो लावू नयेत यासोबतच त्या ठिकाणी जड सामान ठेवू नये.


7. स्थापनेच्या ठिकाणी पावित्र्याकडे विशेष लक्ष द्यावे. चप्पल-बूट घालूं कोणीही स्थापना स्थान अपवित्र करू नये.


8. कोणत्याही प्रकारचे व्यसन मूर्ती स्थापनेच्या ठिकाणी करू नये. यामुळे त्या जेजेचे पावित्र्य नष्ट होते.


9. स्थापनेनंतर गणेश मूर्ती इकडे-तिकडे सरकवु नये. स्थापित केलेली मूर्ती चुकूनही हलवण्याचा प्रयत्न करू नये.


10. गणेश मूर्ती स्थापनेच्या ठिकाणी रोज एखाद्या धर्म ग्रंथाचे पाठ केल्यास शुभफळ प्राप्त होतील.

बातम्या आणखी आहेत...