आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश चतुर्थी 13 सप्टेंबरला : शुभ योगामध्ये स्थापित श्रीगणेश दूर करतील सर्व अडचणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी उत्सव साजरा केला जातो. यावर्षी हा उत्सव 13 सप्टेंबर, गुरुवारी आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. अमर डिब्बावाला यांच्यानुसार यावेळी एंद्र योग आणि तूळ राशीतील चंद्रमध्ये श्रीगणेशाची स्थापना केली जाईल. यावर्षी दहा दिवसांचा गणेशोत्सव खास राहील. यामध्ये मातीची पार्थिव गणेश मूर्ती स्थापित करणे श्रेष्ठ राहील.


शुभ योगात होणार गणेश उत्सवाची सुरुवात..
पं. डिब्बावाला यांच्यानुसार एंद्र योग, तूळ राशीतील चंद्र, स्वाती नक्षत्र आणि गुरुवारचा संयोग आहे. पंचांग गणनेनुसार असा योग फार कमी जुळून येतो. शुभ दिवस, शुभ नक्षत्र, शुभ योग आणि शुभ वार असल्यामुळे श्रीगणेश सर्वकाही शुभ करण्यासाठी विराजित होतील. या योगामध्ये पार्थिव मूर्ती पूजन फलदायी राहते. 13 ते 22 सप्टेंबरपर्यंत गणेशोत्सवानंतर 23 तारखेला अनंत चतुर्दशीला गणेश मूर्ती विसर्जन केले जाईल. 


भाद्रपद शुक्ल पक्षात साजरे केले जाणारे व्रत उत्सव 
हरितालिका, वराह जयंती- 12 सप्टेंबर
गणेश स्थापना- 13 सप्टेंबर
ऋषि पंचमी- 14 सप्टेंबर
महालक्ष्मी व्रत सुरु- 16 सप्टेंबर
राधा अष्टमी- 17 सप्टेंबर
चंद्र नवमी- 18 सप्टेंबर
परिवर्तन एकादशी- 20 सप्टेंबर
वामन जयंती- सप्टेंबर
शनि प्रदोष- 22 सप्टेंबर
अनंत चतुर्दशी- 23 सप्टेंबर

बातम्या आणखी आहेत...