आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गजकेसरी, इंद्र आणि स्थिर योगात होणार गणेश स्थापना, अशाप्रकारे पूजा केल्यास होईल धन लाभ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थीचा उत्सव साजरा केला जातो. धर्म ग्रंथानुसार याच दिवशी श्रीगणेशाचे प्राकट्य झाले होते. या दिवशी प्रत्येक घरात श्रीगणेशाची स्थापना केली जाते. यावर्षी हा उत्सव 13 सप्टेंबर, गुरुवारी आहे.


शुभ योगात होणार गणेश उत्सवाची सुरुवात...
उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार स्वाती नक्षत्राच्या संयोगाने स्थिर नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगामध्ये गणपतीची स्थापना केल्याने सर्व स्थायी सुख आणि लक्ष्मी प्राप्त होईल. चंद्र तूळ राशीमध्ये देवगुरु बृहस्पतीसोबत गजकेसरी नावाचा राजयोग तयार करत आहे. यासोबतच यावेळी गणेश स्थापनेत इंद्र योग तयार होत आहे. भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थीला शुभ दिवस, शुभ नक्षत्र, शुभ, शुभ वार असल्यामुळे श्रीगणेश सर्वप्रकारे शुभफळ देणारे राहतील.


पूजन विधी...
सकाळी लवकर उठून स्नान व नित्यकर्म झाल्यानंतर आपल्या सामर्थ्यानुसार सोने, चांदी, तांब, पितळ किंवा मातीपासून तयार केलेल्या श्रीगणेशाच्या मूर्तीची स्थापना करावी. (शास्त्रामध्ये मातीपासून तयार केलेल्या मूर्तीची स्थापना श्रेष्ठ मानण्यात आली आहे) संकल्प मंत्रानंतर षोडशोपचार पूजा व आरती करावी. श्रीगणेशाच्या मूर्तीला शेंदूर, गुलाल लावावा. मंत्राचा उच्चार करीत 21 दुर्वा अर्पण कराव्यात. 21 मोदकांचा नैवेद्य दाखवावा. यामधील 5 मोदक मूर्तीसमोर ठेवावेत आणि 5 मोदक ब्राह्मणांना द्यावेत. उर्वरित मोदक प्रसाद म्हणून सर्वांना वाटावेत.


पूजेला सुरुवात करण्यापूर्वी खालील संकल्प मंत्राचा उच्चार करावा..
‘मम सकुटुंबस्य क्षेमस्थिती आयुरारोग्य ऐश्वर्याभिवृद्धी, सर्वकाम निर्विघ्न सिद्धी, पुत्रपौत्र धनधान्य समृद्धीद्वारा प्रतिवार्षिक विहितम् श्री सिद्धिविनायक देवताप्रीत्यर्थ ध्यानावाहनादी षोडशोपचारै: पूजां करिष्ये।’


प्राणप्रतिष्ठा मंत्र :
रक्तांबोधिस्थपोतोल्लसदरुण सरोजधिरूढा कराब्जै:।
पाशाकोदंड भिक्षूद्रभवमथगुणप्यंकुशम् पंचबाणान्।।
बिभ्राणासृक्कपालं त्रिनयनलसिता पीतवक्षोरुहाढ्याम्।
देवी बालार्कवर्णा भवतु सुखकारी प्राणरुक्ति: परान:।।


पूजा करताना खालील मंत्राचा उच्चार करावा...
ऊं गं गणपतये नम:


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, दुर्वा अर्पण करताना कोणत्या मंत्राचा उच्चार करावा...

बातम्या आणखी आहेत...