Ganesh Chaturthi / राक्षसांचा अंत करण्यासाठी श्रीगणेशाने घेतले होते वेगवेगळे अवतार

एकदंत स्वरूपात मदासुर आणि महोदर स्वरूपात मोहसूरला केले होते पराभूत

रिलिजन डेस्क

Sep 02,2019 12:10:00 AM IST

सोमवार 2 सप्टेंबरपासून गणेश उत्सव सुरु होत आहे. या दरम्यान श्रीगणेशाच्या वेगवेगळ्या स्वरुपांची पूजा केली जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार ज्याप्रमाणे राक्षसांचा नाश करण्यासाठी भगवान विष्णू यांनी अवतार घेतले, ठीक त्याचप्रमाणे श्रीगणेशानेही अवतार घेतले आहेत. येथे जाणून घ्या, कोणकोणता अवतार कोणत्या राक्षसाचा अंत करण्यासाठी श्रीगणेशाने घेतेले होते...


एकदंत
गणेशाचा एकदंतावतार देही-ब्रह्माचा धारक आहे, तो मदासुराचा वध करणारा आहे. त्याचे वाहन मूषक सांगितले गेले आहे. मदासूर नावाचा दैत्य होता. तो महर्षी च्यवनाचा पुत्र होता. एके दिवशी त्याने दैत्यगुरू शुक्राचार्यांची भेट घेऊन म्हणाला, ‘‘मला शिष्य म्हणून स्वीकारा. मी संपूर्ण ब्रह्मांडाचा स्वामी होऊ इच्छितो. ती पूर्ण होण्यासाठी मार्गदर्शन करावे.’’ शुक्राचार्यांनी शिष्यत्व दिले. त्यानंतर शक्तिमंत्र दिला. त्यानंतर मदासूर तप करण्यासाठी अरण्यात गेला. त्याच्या कठोर तपश्चर्येने भगवती प्रसन्न झाली. ब्रह्मांडनायक होण्याचे वरदान दिले. त्यानंतर मदासुराने पृथ्वीवर साम्राज्य स्थापन केले. नंतर स्वर्गावर चढाई केली. इंद्राचा पराभव केला. सर्वत्र असुरांचे क्रूर शासन सुरू झाले. पृथ्वीवरील धर्म-कर्म संपून गेले. चहूकडे हाहाकार माजला.


चिंतातूर देवगण सनत्कुमाराजवळ गेले. असुरांच्या विनाशाचा उपाय विचारला. सनत्कुमार म्हणाले, ‘‘देवगण हो, श्रद्धापूर्वक एकदंताची उपासना करा. ते संतुष्ट होऊन मनोकामना पूर्ण करतील.’’ देवतांच्या उपासनेने मूषक वाहनावरील एकदंत प्रकटले. त्याच्यासमोर देवतांनी विनवणीपूर्वक मदासुराचा वध करण्यास सांगितले. दवर्षींनी हा निरोप मदासूरापर्यंत धाडला. क्रोधित मदासूर युद्धासाठी निघाला. धनुष्यावर बाण चढवणार इतक्यात तीव्र परशूचा घाव लागला. तो जमिनीवर कोसळला. सावध झाल्यानंतर पाहतो तर परमात्माच समोर..मदासुराने हात जोडले. क्षमा मागितली. त्याला अभयदान देत एकदंत म्हणाले, ‘‘ज्या ठिकाणी माझी पूजा-आराधना होते, त्या ठिकाणी येऊ नकोस. आजपासूनच तू पाताळात वास्तव्यास जा.’’ जशी आज्ञा म्हणत मदासूर पाताळात गेला. देवगण एकदंताचा जयजयकार करीत स्वर्गलोकी निघून गेले.


वक्रतुंड
भगवान श्रीगणेशाचा ‘वक्रतुंडावतार’ ब्रह्मरूपाने संपूर्ण शरीरांना धारण करणारा, मत्सरासुराचा वध करणारा तसेच सिंहासनावर आरूढ होणारा आहे. प्रथम अवतार वक्रतुंडाचा. त्याची कथा अशी : देवराज इंद्राच्या प्रमादामुळे मत्सरासुराचा जन्म झाला. त्याने दैत्यगुरू शुक्राचार्यांपासून शिवाच्या पंचाक्षरी मंत्राची (ओम नम: शिवाय) दीक्षा प्राप्त केली.


शंकराकडून अभयदानाचे वरदान मिळवले. त्यानंतर तो दैत्यांचा राजा झाला. मंत्रांनी विश्वविजयी होण्याचा सल्ला दिला. आक्रमणे करून त्याने भूतलावर, स्वर्गलोकी राज्य मिळवले. देव दु:खी झाले. त्याच वेळी दत्तात्रेय आले. त्यांनी देवतांना वक्रतुंडाच्या एकाक्षरी मंत्र (गं)चा उपदेश केला. त्याने वक्रतुंड प्रगट झाले. असंख्य गणांसह मत्सरासुराशी युद्ध केले. वक्रतुंडाच्या भयानक रूपापुढे मत्सरासुराचा पराभव झाला. देवगण वक्रतुंडाचे गुणगान करू लागले.

श्री गजानन
देवगणांचे कोशाध्यक्ष कुबेर कैलासाला गेले. तेथे त्यांनी शिव-पार्वतीचे दर्शन घेतले. भगवती उमाच्या अनुपन सौंदर्याकडे एकटक पाहू लागले. त्याने देवी क्रोधित झाली. कुबेर भयभीत झाले. त्याच्या भीतीपासून लोभासूर उत्पन्न झाला. तो अत्यंत प्रतापी आणि बलवान होता. तो शुक्राचार्यांकडे गेले. त्याच्या आदेशाने वनात तपश्चर्येसाठी गेला. तेथे पंचाक्षरी मंत्राचा जप करू लागला. भगवान शंकराच्या प्रसन्नतेसाठी घोर तपश्चर्या सुरू केली. शेवटी शिव प्रकटले. त्रैलोक्यात निर्भय होण्याचा वर दिला. निर्भय झालेल्या लोभासूराने त्रैलोक्यावर चढाई करून स्वत:चे साम्राज्य निर्माण केले. पराभूत झालेल्या इंद्राने भगवान विष्णूकडे धाव घेतली. विष्णू असुरांचा संहार करण्यासाठी गरूडावर स्वार होऊन आले. परंतु शंकराच्या वरामुळे त्यांनाही पराभूत व्हावे लागले. लोभासूराच्या उन्मादाने भगवान शंकरालाही ललकारले. शंकरालाही दिलेल्या वरदानाची आठवण झाली आणि ते कैलासाचा त्याग करून निघाले. रैभ्य मुनींच्या सांगण्यावरून देवतांनी गणेश उपासना सुरू केली. प्रसन्न होऊन गजानन प्रकटले. खुद्द भगवान शंकर आणि शुक्राचार्याने गजाननाची महती सांगून त्यांच्यापुढे शरण जाण्यास सांगितले. लोभासूराने गणेशतत्त्वाला समजून घेतले आणि त्याच्या चरणी लीन झाला.


महोदर
गणेशाचा महोदर अवतार ज्ञान-ब्रह्मचा प्रकाशक आहे. त्याने मोहासुराच्या विनाशासाठी जन्म घेतला. मोहासूर दैत्यगुरू शुक्राचार्याचा शिष्य. त्याने सूर्याची आराधना केली. सूर्यदेव प्रसन्न झाले. सर्वत्र विजयी होण्याचे वरदान दिले. त्यानंतर तो त्रैलोक्याचा अधिपती झाला. देवगण आणि मुनिगण अरण्यात लपून बसले. सूर्याकडे जाऊन या भयानक विपत्तीतून मुक्त करण्याचा उपाय विचारला. सूर्यदेवाने त्यांना एकाक्षर मंत्र देऊन गणेशाला प्रसन्न करण्याची प्रेरणा दिली. देव व मुनिगण भक्तिपूर्वक महोदराची उपासना करू लागले. त्याने संतुष्ट होऊन महोदर प्रकटले. मोहासुराचा वध करण्याचे वचन देऊन त्यांना निश्चिंत राहण्यास सांगितले. मूषकावर सवार झालेले महोदर मोहासुराशी युद्ध करण्यासाठी निघाले. देवर्षींनी हा समाचार मोहासुरापर्यंत पोहोचवला. शुक्राचार्य, भगवान विष्णू यांनी मोहासुराला सल्ला दिला की महोदराला शरण जावे. त्यांच्या सल्ल्याने मोहासुराचा अहंकार नष्ट झाला. त्याने भगवान विष्णूंना सांगितले, ‘भगवंत, महोदरांना आपल्या नगरीत पाचारण करून त्यांचे दर्शन मिळवून द्यावे.’ भगवान महोदर मोहासुराच्या नगरीत आले. त्यांचे अभूतपूर्व स्वागत झाले. भक्तिपूर्वक पूजा झाली. त्यानंतर मोहासूर म्हणाला, ‘अज्ञानाला वश झाल्यामुळे माझ्याकडून अपराध झाला. क्षमा करा. कोणत्याही धर्माचरणात विघ्ने आणणार नाही.’ महोदरांनी त्याला क्षमा केले. त्यानंतर त्रैलोक्यात शांतता प्रस्थापित झाली.


श्रीगणेश अवताराच्या इतर रोचक गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...

लंबोदर भगवान विष्णूच्या मोहिनी रूपाला पाहून भगवान शिव काममोहित झाले. परंतु विष्णूंनी जेव्हा त्या रूपाचा त्याग केला तेव्हा शिव दु:खी झाले. त्यात त्यांचा वीर्यपात झाला. त्यापासून एक महापराक्रमी काळ्या रंगाचा असूर उत्पन्न झाला. त्याचे डोळे तांब्याच्या धातूसारखे चमकदार होते. शुक्राचार्याने त्याचे नाव ‘क्रोधासूर’; ठेवले. ब्रह्मांडावर विजय मिळवण्यासाठी क्रोधासूरने मंत्र देण्याची विनंती केली. शुक्राचार्यांनी त्याला सूर्यमंत्राची दीक्षा दिली. त्याने एका पायावर उभे राहून सूर्यमंत्राचा जप केला. त्याने सूर्यदेव प्रसन्न झाले. ब्रह्मांडावर विजय मिळवण्याचा वर दिला. त्याच्या आधाराने क्रोधासूर त्रैलोक्याचा अधिपती झाला. सर्वत्र असुरांचे राज्य निर्माण झाले. सूर्यानेदेखील सूर्यलोकाचा त्याग केला. देव व ऋषिमुनी अतिशय दु:खी झाले. त्यांनी भगवान लंबोदराची आराधना केली. लंबोदर प्रकटले आणि क्रोधासुराचा अहंकार नष्ट करण्याचे वचन दिले. दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले. देवगणही असुरांचा संहार करू लागले. क्रोधासूरच्या मोठ-मोठय़ा योद्धय़ांना मृत्युमुखी पाडले. क्रोधासूरची शक्ती क्षीण झाली. त्याने लंबोदर चरणी शरणागती पत्करली. कृपाळू लंबोदराने त्याला अभयदान दिले. त्यांच्या कृपाशीर्वादाने चांगले जीवन जगण्यासाठी क्रोधासूर पाताळात निघून गेला. हे पाहून सर्व देवतांनी भगवान लंबोदराचे गुणगान करू लागले.विकट भगवान विष्णू जालंधर राक्षसाच्या वधासाठी गेले. जालंधराची पत्नी वृंदा हिचा तपभंग केला. याचवेळी कामासूर उत्पन्न झाला. तो महान तेजस्वी होता. शुक्राचार्यांकडून दीक्षा घेतल्यानंतर तो तपश्चर्येसाठी वनात निघून गेला. पंचाक्षरी मंत्राच्या जपाने भगवान शिव प्रसन्न झाले. मृत्यूवर जय मिळवण्याचा वर दिला. जालंधर मोठय़ा खुशीने शुक्राचार्यांकडे आला. संपूर्ण समाचार सांगितला. शुक्राचार्य संतुष्ट होऊन महिषासुराची कन्या तृष्णा हिच्याशी विवाह करून दिला. त्यानंतर त्याला दैत्यांचा अधिपती केले. त्याने रतिद नामक नगरीला राजधानी म्हणून जाहीर केले. रावण, शंबर, महिष, बळी अशा दैत्यांना सैन्याचे मुख्य अधिकारी म्हणून नियुक्त केले. त्यांच्या बळावर त्याने पृथ्वीवर आक्रमण केले. नंतर स्वर्गावर आक्रमण केले. त्रैलोक्याचा अधिपतीच झाला. देव आणि ऋषिमुनी मयूरेश क्षेत्रात गेले. गणेशाची पूजा केली. त्यांच्या उपासनेने मयूर वाहनावरून भगवान गणेश विकट प्रकटले. कामासूरच्या वधाचे वचन दिले. तेथेच अंतर्धान पावले. मयूर वाहन असलेल्या भगवान विकटांनी देवतांना घेऊन कामासूरच्या नगरीला वेढा घातला. घनघोर युद्ध सुरू झाले. त्यात कामासूरचे दोन पुत्र मारले गेले. त्याने क्रोधित होऊन विकटांच्या दिशेने कामासुराने गदा फेकली. ती विकाटाला स्पर्श न करताच जमिनीवर आदळली. कामासूर मूच्र्छित झाला. शेवटी शरण आला.धूम्रवर्ण ब्रब्रह्मदेवाने सूर्याला कर्माध्यक्षपद दिले. त्याने सूर्यदेवाच्या मनात अहंकार उत्पन्न झाला. त्यावेळी त्यांना शिंक आली. त्यापासून अहंतासुराचा जन्म झाला. त्याने शुक्राचार्यांकडून गणेशमंत्राची दीक्षा घेतली.कठोर तपश्चर्येनंतर भगवान गणेश प्रकटले आणि अहंतासुराला ब्रह्मांडावर राज्य, अमरत्वप्राप्तीचा वर दिला. त्यानंतर अहंतासुराने विश्वविजयासाठी प्रस्थान ठेवले. असुरांकडून भयंकर नरसंहार सुरू झाला. देवता, ऋषी, मुनी पर्वतात लपून राहिले. असाहाय्य अवस्थेत त्यांनी भगवान शंकर आणि ब्रह्मदेवाचा सल्ला घेतला. त्यानुसार गणेशाची आराधना सुरू केली. श्रीगणेश प्रसन्न झाले. त्यांच्या दु:ख निवारणाचे वचन दिले. त्याची वार्ता देवर्षी नारदांनी अहंतासुराकडे पोहोचवली. धूम्रवर्ण गणेशाला शरण जाण्यास सांगितले. परंतु अहंतासूर क्रोधित झाला. नारदाला परत पाठवले. धूम्रवर्ण गणेशाने असूर सेनेवर पाश टाकला. असुरांच्या नरडीला तो आवळला गेला. ते यमलोकाला जाऊ लागले. शेवटी त्याने शरणागती पत्करली. धूम्रवर्ण गणेशाची पूजा केली. त्याला अभयदान देत, श्रीगणेश म्हणाले, ‘माझ्या भक्तांना कधीही दु:खी-कष्टी करू नकोस.’; धूम्रवर्ण गणेशाला वंदन करून अहंतासूर निघून गेला.विघ्नराज भगवती पार्वती सख्यांबरोबर बोलताना हसल्या. त्यातून एका पुरुषाचा जन्म झाला. पाहता पाहता तो पर्वताकार झाला. पार्वतीने त्याचे नाव ‘ममतासूर’; ठेवले. त्याला गणेशाचे स्मरण करण्यास सांगितले. त्यानुसार ममतासूर तपश्चर्येसाठी वनात निघून गेला. तिथे त्याची शंबरासुराशी भेट झाली. त्याने ममतासुराला आसुरी विद्या शिकवल्या. त्यानंतर शंबरासुराने विघ्नराज उपासनेची प्रेरणा दिली. ममतासुराची तपश्चर्या सुरू झाली. गणनाथ प्रसन्न झाले. त्यांच्याकडून ब्रह्मांडावर राज्य करण्याचा वर मिळवला. त्रैलोक्यावर चढाई केली. युद्धात भगवान विष्णू आणि शिवालाही पराजित केले. संपूर्ण ब्रह्मांडावर असुरांचे राज्य निर्माण झाले. देवता कारागृहात बंदिस्त झाले. त्यांनी विघ्नराजची पूजा सुरू केली. त्याने प्रसन्न होऊन भगवान विघ्नराज प्रकटले. देवतांनी ममतासुराचा उच्छाद सांगितला. विघ्नराजने नारदांमार्फत ममतासुराकडे शरण येण्याचा संदेश पाठवला. अहंकारी ममतसुराने त्याला दाद दिली नाही. विघ्नराज क्रोधित झाले. आपल्या हातातील कमळ असूर सेनेत सोडले. त्याच्या गंधाने असूर मूच्र्छित झाले. शक्तिहीन झाले. ममतासूर भीतीने थरथर कापू लागला. त्याने विघ्नराजच्या चरणी लोळण घेतली. क्षमायाचना केली. त्याला अभयदान देत विघ्नराजने त्याला पाताळात पाठवून दिले. देवतागण चहूकडे विघ्नराजचा जयजयकार करू लागले.
X
COMMENT