आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13 सप्टेंबरला घरी येणार श्रीगणेश 23 सप्टेंबरपर्यंत चुकूनही करू नका हे 8 काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावेळी 13 सप्टेंबर, गुरुवारी भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी आहे. या दिवशी घरामध्ये श्रीगणेशाची मूर्ती स्थापना केली जाते. पूजन कर्म करून प्रसन्न केले जाते. 10 दिवस लोक भक्तिभावाने श्रीगणेशाची उपासना करून संकटातून मुक्त करण्याची प्रार्थना 

करतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार या 10 दिवसांमध्ये काही गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास श्रीगणेशाची कृपा प्राप्त होऊ शकत नाही. येथे जाणून घ्या, कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत..


1. श्रीगणेशाच्या स्थापनेपासून विसर्जनापर्यंत (10 दिवस) घरामध्ये स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. गणेश स्थापना करण्याच्या ठिकाणी स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे.


2.10 दिवस ब्रह्मचर्यचे पालन करावे म्हणजेच पत्नीसोबत संबंध बनवू नये.


3. कोणावरही क्रोध करू नये. सयंम बाळगावा. खोटे बोलू नये.


4. घरामध्ये नॉनव्हेज करू नये आणि दारुही पिऊ नये.
 

5. श्रीगणेश घरात असेपर्यंत घराला कुलूप लावू नये. कुटुंबातील एखादा तरी सदस्य घरात अवश्य असावा.


6. शक्य असल्यास कांदा आणि लसणाचा स्वयंपाकात वापर करू नये.


7. घराचे पावित्र्य नष्ट होईल अशी कोणतीही गोष्ट घरात घेऊन येऊ नये.


8. अपवित्र अवस्थेत श्रीगणेशाची पूजा करू नये.

बातम्या आणखी आहेत...