Home | Jeevan Mantra | Dharm | ganesh chaturthi We Can Do Ganesh Puja In These 10 Steps

केवळ 10 स्टेप्समध्ये रोज करू शकता श्रीगणेशाची पूजा, होऊ शकतो भाग्योदय

रिलिजन डेस्क | Update - Sep 13, 2018, 12:05 AM IST

गुरुवार 13 सप्टेंबरपासून रविवार 23 सप्टेंबरपर्यंत प्रथम पूज्य श्रीगणेशाची विशेष पूजा प्रत्येक घरात केली जाईल.

 • ganesh chaturthi We Can Do Ganesh Puja In These 10 Steps

  गुरुवार 13 सप्टेंबरपासून रविवार 23 सप्टेंबरपर्यंत प्रथम पूज्य श्रीगणेशाची विशेष पूजा प्रत्येक घरात केली जाईल. गणेश पूजेने घरामध्ये सुख-समृद्धी येते आणि सर्व त्रासापासून भक्ताचे रक्षण होते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार गणेश पूजेमध्ये सर्व आवश्यक गोष्टी ठेवून योग्यप्रकारे पूजा केल्यास श्रीगणेश लवकर प्रसन्न होऊ शकतात. येथे जाणून घ्या, घरामध्ये श्रीगणेश स्थापना करण्याच्या 10 सोप्या स्टेप्स...


  पूजेसाठी आवश्यक सामग्री...
  तांदूळ, कुंकू, दिवा, गुलाल, धूपबत्ती, दूध, दही, मध, साखर, स्वच्छ पाणी, श्रीगणेशासाठी वस्त्र, लाल फुल, नैवेद्यासाठी मोदक, फळ, जानवे, सुपारी, विड्याचे पान, अत्तर, दुर्वा, केळी, कापूर इ.


  श्रीगणेश पूजेचा सोपा विधी
  1. सकाळी स्नान केल्यानंतर घरामध्ये श्रीगणेश पूजेची व्यवस्था करावी.


  2. सर्वात पहिले श्रीगणेशाचे आवाहन करावे. आवाहन म्हणजे श्रीगणेशाला घरात आमंत्रित करावे.


  3. श्रीगणेशाला सन्मानाने घरात स्थान द्यावे. म्हणजेच आसन द्यावे. त्यानंतर स्नान घालावे.


  4. स्नान पहिले पाण्याने आणि नंतर पंचामृत(दूध, दही, तूप, मध आणि साखर)ने पुन्हा पाण्याने स्नान घालावे.


  5. त्यानंतर श्रीगणेशाला वस्त्र अर्पण करावेत. त्यानंतर दागिने आणि जानवे अर्पण करावे. फुलांची माळ घालावी. दुर्वा अर्पण कराव्यात.


  6. सुगंधित अत्तर लावावे. गंध लावावे.


  7. त्यानंतर दिवा लावावा. कापूर लावावा. आरती करावी.


  8. आरती नंतर प्रदक्षिणा घालावी. नैवेद्य दाखवावा. पान अर्पण करावे.


  9. नैवेद्यामध्ये मोदक, फळ असावे.


  10. श्रीगणेशाची पूजा करताना ऊँ गं गणपतये नम: मंत्राचा जप करत राहावा.


  पूजेच्या शेवटी क्षमायाचना करण्यास विसरू नये.

Trending