आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा पोलिस अधीक्षकासमोर चोपड्यात गणेश भक्तांवर लाठीचार, लोकप्रतिनिधी व पत्रकारांशी घातली हुज्जत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोपडा- रात्री 12 वाजेनंतर मिरवणुकीची वेळ झाली म्हणून जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले याच्या उपस्थितीत रात्री गणपती भक्तांवर थेट लाठीचार केल्याची घटना शहरात घडली. लाठीचार्ज नंतर झालेल्या धावपळीत अनेक गणपती मंडळांच्या ढोल, तशे, बँड बंद करून त्यांना पुढे सरका असा सज्जड दम पोलिस देत होते. विशेष म्हणजे जे पोलिस दम देत होते, किव्हा ज्यांनी लाठीचार केला ते सर्व पोलिस फौजफाटा हा स्थानिक नव्हते तर सर्व बाहेरचे होते, त्यामुळे स्थानिक शांतता कमिटीच्या पदाधिकारी व पत्रकारांशी देखील पोलिसांनी हुज्जतही झाल्या होत्या.
पी.एस. घोडगावकर दुकानासमोर हा लाठीचार्ज झाला तेव्हा आपण शांततेत घ्या असे सांगण्यासाठी गेलेले शेतकी संघाचे चेअरमन चंद्रशेखर पाटील यांनादेखील बाहेरच्या पोलिसांनी घेराव घातला होता. यावेळी ते बाहेरचे पोलिस चंद्रशेखर पाटील यांना मारणार हे लक्षात येताच चोपडा शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनायक लोकरे, शिवसेना शहरप्रमुख आबा देशमुख, गटनेते महेश पवार हे मध्यस्थीस गेले. 


पोलिस कर्मचारी हिरालाल पाटील यांनी एका महिलेला मारले म्हणून चंद्रशेखर पाटील त्याच्या मदतीला धावून गेले व उलट हिरालाल पाटील हे चंद्रशेखर पाटील याच्यावर संताप व्यक्त करत होते. त्याच्या आधी रात्री 11 वाजता याच हिरालाल पाटील यांनी पत्रकार प्रतिनिधी पंकज पाटील व प्रवीण पाटील यांच्याशी मशिदी जवळ उभे राहण्यावरून नाहक वाद घातला. हा वाद खुद्द अप्पर पोलिस अधीक्षक सचिन गोरे याच्यासमोर पंधरा मिनिटे झाला. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहोम, सुशील पाटील, नारायण पाटील यांनी त्या हिरालाल पाटील यांना शांत केले.
रात्री 12 वाजेनंतर लाठीचार्ज चुकीचा झाला म्हणून माजी आमदार कैलास पाटील यांनी देखील थेट जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. उगले यांना सांगत असताना मंडळाला वाजत गाजत जाऊ द्या अशी विनंती केली होती. यावेळी शिवसेना शहर प्रमुख आबा देशमुख व नगरसेवक महेश पवार यांनी देखील पोलिसांच्या विरोधात जाऊन गणेश भक्तांसाठी लाठीचार्ज विरोधात आवाज उठविला. लाठीचार्ज झाल्यानंतर काही मंडळ पी एस घोडगावकर याच्या दुकानापासून ते मुस्तफा दर्ग्याच्या पुढे बिना वाद्यांचे गेले. साडे अकरा वाजता माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील यांचे ईगल क्लब मित्र मंडळाचे देखील वाद्य पोलिसांनी जप्त करून घेतले, त्यामुळे लहान लहान मुली नाचत गात घोषणा देऊन मिरवणुकीतून पुढे निघून गेल्या. यामुळे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठी नाराजी व्यक्त केली.

अखेर 2 वाजले विसर्जन मिरवणुकीला
गेल्या वर्षी तत्कालीन पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या काळात हीच मिरवणूक तीन वाजता कुठलेही वाद न होता पार पडली होती, पण यावेळी पोलिस व गणेश भक्तांमध्ये अनेक ठिकाणी वाद झाले आणि रात्री 12 नंतर लाठीचार्ज केल्यानंतर ही विसर्जन मिरवणुकीला रात्री 2 वाजले. त्यानंतर 3 वाजेपर्यंत शिवाजी चौकात एकत्र आठ ते दहा गणेश मंडळ जमल्याने शिवाजी चौकाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.


यावेळी मोठं मोठ्या गणपतीच्या मूर्त्या 3 वाजेपर्यंत शिवाजी चौकात उभ्या होत्या त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले सह सर्व बंदोबस्त उभा होता. सर्वात शेवटी भाटगल्लीचे पदाधिकारी माजी उपनगराध्यक्ष प्रमोद भाट घरी गेले होते. या सर्व विसर्जन मिरवणुकीत स्थानिक पोलिस निरीक्षक विनायक लोकरे व अप्पर पोलिस अधीक्षक सचिन गोरे यांनीच फक्त शांतता, संयमाची भूमिका घेतल्याचे राजकीय नेते व पदाधिकारी यांनी पत्रकारांना बोलून दाखवले.

बातम्या आणखी आहेत...