Ganesh Chaturthi / माती तसेच हळकुंड किंवा लाकडापासून तयार केलेल्या गणेशाचीही करू शकता स्थापना

श्रीगणेशाचे 4 सर्वश्रेष्ठ स्वरूप, यांची पूजा केल्याने दूर होऊ शकते दुर्भाग्य

रिलिजन डेस्क

Sep 01,2019 12:15:00 AM IST

सोमवार 2 सप्टेंबरपासून गुरुवार 12 सप्टेंबरपर्यंत गणेश उत्सव साजरा केला जाईल. श्रीगणेश प्रथम पूजनीय देवता असून यांच्या वेगवेगळ्या स्वरुपांची पूजा केल्यास सर्व देवी-देवतांची कृपा प्राप्त होते. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात श्रीगणेशाची पूजा करूनच केली जाते. यामुळे कार्य निर्विघ्नपणे पार पडते. येथे जाणून घ्या, श्रीगणेशाच्या अशाच 4 स्वरुपांची माहिती. या 4 गणेश स्वरुपांची पूजा केल्यास घर-कुटुंबावर लक्ष्मीसहित सर्व देवी-देवतांची कृपा राहते.


हळकुंडापासून तयार झालेले श्रीगणेश -
हळकुंडामध्ये श्रीगणेशाची आकृती दिसेल असे हळकुंड देवघरात स्थापन करून दररोज याची पूजा करावी. गणेश मूर्ती स्वरुपात या हळकुंडाची पूजा केली जाऊ शकते. जर सोन्याची गणेश मूर्ती नसेल तर हळदीपासून तयार करण्यात आलेल्या गणपतीची पूजा करू शकता. सोन्यापासून आणि हळदीपासून तयार करण्यात आलेल्या गणेश मूर्तीचा पूजा समान फळ प्रदान करते.


गोमय म्हणजे शेणापासून तयार करण्यात आलेली गणेश मूर्ती -
गायीला देवी मानण्यात आले आहेत. गोमाता पूजनीय आणि पवित्र आहे. प्राचीन प्रथेनुसार गायीच्या शेनामध्ये महालक्ष्मीचा निवास मानण्यात आला आहे. याच कारणामुळे गायीच्या शेणापासून तयार करण्यात आलेल्या गणेश मूर्तीची पूजा धनलाभ करून देणारी मानली गेली आहे. शेणापासून गणेशाची आकृती तयार करून त्या गणेश मूर्तीची पूजा करावी. प्राचीन काळी सुख-समृद्धी प्राप्त करण्यासाठी दररोज घरामध्ये शेणाचा सडा टाकला जायचा. घर शेणाने सारवून घेतले जायचे. यामुळे घरातील वातावरण पवित्र आणि सकारत्मक राहते.


लाकडाचे श्रीगणेश -
विविध झाडांपासून मिळणारे लाकूड पवित्र आणि पूजनीय मानले जाते. नैसर्गिक स्वरुपात विशेष खास झाडांमध्ये लक्ष्मीचा निवास मानला गेला आहे. उदा. पिंपळ, आंबा, लिंब. यामुळे लाकडापासून तयार करण्यात आलेली गणेश मूर्ती घराच्या मुख्य दरवाजावर लावावी. दररोज या गणेश मूर्तीची पूजा केल्यास घरातील वातावरण शुभ राहते आणि लक्ष्मी कृपा प्राप्त होते.


श्वेतार्क गणेश -
पांढर्‍या रुईच्या झाडाच्या मुळाशी श्रीगणेशाची आकृती (मूर्ती) तयार होते. या मूर्तीला श्वेतार्क गणेश म्हणतात. या मूर्तीची पूजा केल्यास सुख-सौभाग्यामध्ये वृद्धी होते. रविवारी किंवा पुष्य नक्षत्रावर श्वेतार्क गणेशाची मूर्ती घरी आणून नियामिपणे पूजा करावी. या गणेश पूजेने घरामध्ये कायम सुख-समृद्धी राहते.

X
COMMENT