आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परंपरा : 2 सप्टेंबरपासून गणेश उत्सव, पूजेमध्ये वाकडे-तिकडे आणि उलटे स्वस्तिक काढू नये

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार, 2 सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरु होत आहे. या दिवशी प्रत्येक घरामध्ये श्रीगणेशाची मूर्ती स्थापित केली जाते. यावर्षी हा उत्सव 11 दिवस म्हणजेच गुरुवार 12 सप्टेंबरपर्यंत साजरा केला जाईल. श्रीगणेश पूजेमध्ये सर्वतप्रथम गणेशाचे प्रतीक चिन्ह स्वस्तिक काढले जाते. श्रीगणेश प्रथमपुज्य देवता असल्यामुळे पूजन कर्माच्या सुरुवातीला स्वस्तिक काढण्याची परंपरा आहे. स्वस्तिक काढून पूजा केल्याने धर्म-कर्म यशस्वी होतात आणि ज्या इच्छापूर्तीसाठी पूजा केली जाते ती इच्छाही देवता पूर्ण करतात. स्वस्तिक योग्य पद्धतीने काढले तरच पूजेचे फळ प्राप्त होते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, पूजा यशस्वी करण्यासाठी स्वस्तिक काढताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे...

# स्वस्तिक सरळ आणि सुबक असावे
स्वस्तिक अगदी सरळ आणि सुबक असावे. वाकडे स्वस्तिक शुभ मानले जात नाही. हे शुभ चिन्ह सुंदर, सरळ आणि स्पष्ट दिसेल असे काढावे. लक्षात ठेवा, कधीही घरात उलटे स्वस्तिक काढून नये. मंदिरामध्ये उलटे स्वस्तिक विशेष इच्छापूर्तीसाठी काढले जाते. परंतु घर आणि दुकानात उलटे स्वस्तिक काढू नये. असे केल्याने अशुभ फळ प्राप्त होऊ शकतात. घर किंवा दुकानात कुठेही काढण्यात आलेल्या स्वस्तिकजवळ स्वच्छता आवश्यक आहे. या ठिकाणी स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे.

# सकारात्मक उर्जेला आकर्षित करते स्वस्तिक
स्वस्तिक धनात्मक म्हणजे सकारात्मक उर्जेला आकर्षित करते. दरवाजावर स्वस्तिक काढल्याने घरात नकारात्मकता प्रवेश करत नाही आणि दैवी शक्ती आकर्षित होतात. दरवाजावर स्वस्तिक काढल्याने वास्तुदोषही नष्ट होतात.
> वैवाहिक जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी पूजा करताना हळदीने स्वस्तिक काढावे.
> सर्व प्रकारच्या पूजन, हवनमध्ये कुंकुवाने स्वस्थिक काढावे.