Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | ganesh festivle, mohram celebration in ozar, nashik

सामाजिक सलोख्याने गणेशोत्सव, मोहरम साजरा करा - अतुल झेंडे, ओझरकरांची परंपरा गौरवास्‍पद

प्रतिनिधी | Update - Sep 07, 2018, 04:46 PM IST

सण-उत्सव हे एकात्‍मतेने आणि सौदार्हतेने साजरे करण्याची ओझरकरांची परंपरा गौरवास्पद आहे.

 • ganesh festivle, mohram celebration in ozar, nashik
  गणेशोत्सव प्रसंगी मंडळाना सूचना देतांना नाशिक ग्रामीण उपअधीक्षक अतुल झेंडे.

  ओझर - सण-उत्सव हे एकात्‍मतेने आणि सौदार्हतेने साजरे करण्याची ओझरकरांची परंपरा गौरवास्पद आहे. हिच परंपरा यापुढे कायम ठेवावी. सण उत्सव शांततेत साजरे करून संपूर्ण ओझर शहर 'डॉल्बी मुक्त' करण्याचे आवाहन नाशिक ग्रामीण पोलिस उपअधीक्षक अतुल झेंडे यांनी केले. एच. ए. एल हायस्कूल इंग्रजी माध्यमाच्या सभागृहात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत त्‍यांनी मनोगत व्यक्त केले.

  गणेशोत्सव व मोहरम, पोळा हे सण शांततेत साजरे करण्यासाठी ओझर पोलिस ठाण्यामार्फत शांतता समिती बैठक आयोजित करण्यात आली होती. गणेशोत्सवात ओझर शहराची आगळीवेगळी ओळख निर्माण करण्यासाठी गणेश मंडळांनी कर्णकर्कश डिजे टाळून पारंपरिक ‘ढोल-ताशा’चा वापर करावा, असे आवाहन नाशिक ग्रामीणचे पोलीस उपविभागीय अधिकारी व शांतता समितीच्या अध्यक्षस्थानी असलेले अतुल झेंडे यांनी केले. आगामी सन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवामध्ये मंडळांनी नाशिक जिल्हा पोलिस दला मार्फत राबवण्यात येणाऱ्या विघ्नहर्ता योजनेची नियमावली लक्षात घेऊन सामजिक सलोखा निर्माण होईल, असे उपक्रम राबवावे. वर्गणी साठी जबरदस्ती करु नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी व्यासपीठावर निफाडचे विद्यमान पंचायत समिती सदस्य नितीन पवार, पोलिस निरीक्षक राजकुमार उपासे, जेष्ठ नागरिक श्रीपाद देशमुख, ओझर तलाठी उल्हास देशमुख, महावितरणचे सहाय्यक अभियंता सोनवणे, समाजसेवक शब्बीर खाटीक उपस्थित होते.

  पारंपरिक वाद्ये व पर्यावरणस्नेही पध्दतीच्या वापरातून गणेशोत्सवाचे ब्रँडिंग करता येईल. रहदारीला अडथळा येणार नाही, अशी मंडप उभारणी, अधिकृत वीज जोडणी करून घ्यावी असे त्‍यांनी सांगितले. प्रत्येक मंडळाने आवश्यक त्या परवानग्या घेणे बंधनकारक आहे. दिवसा व रात्री स्वयंसेवकांची नेमणूक, गणपती मूर्तीच्या ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरा, मंडळ पदाधिकाऱ्यांची यादी पोलिसांकडे देणे बंधनकारक आहे, असे पोलिस निरीक्षक राजकुमार उपासे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.

  मागील वर्षी ओझर शहरातील गणेशोत्सव मंडळांतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. त्‍यांचा गौरव करण्‍यासाठी पोलिस दलाच्या वतीने पाच पारितोषिक वितरण करण्यात आले. यात ओझरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळ मेनरोड यांना प्रथम पुरस्‍कार, द्वितीय पुरस्‍कार सार्वजनिक श्रीगणेश मित्र मंडळ, टाऊनशिप ओपन थेएटर यांना तर तृतीय पुरस्‍कार नागेश्वर गणेश मित्र मंडळ, धनगर गल्ली यांना देण्‍यात आला. तसेच उत्तेजनार्थ पुरस्‍कार रुपेश्वर गणेश मित्र मंडळ शिवाजी चौक आणि वीर तानाजी चौक, गणेश मित्र मंडळ यांना देण्यात आला.

 • ganesh festivle, mohram celebration in ozar, nashik
  डी. जे संदर्भात नियमावली तरुणांना समजून सांगतांना नाशिक ग्रामीण उपअधीक्षक अतुल झेंडे.
 • ganesh festivle, mohram celebration in ozar, nashik
 • ganesh festivle, mohram celebration in ozar, nashik

Trending