Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Ganesh mandals should use one third part of road

गणेश मंडळांनी रस्त्याचा एक तृतीयांश भाग वापरावा, मूर्ती हवी लहान

प्रतिनिधी | Update - Aug 24, 2018, 12:36 PM IST

आपण लोकशाहीचे घटक आहोत. न्यायालयांनी दिलेल्या नियमांचे पालन करत गणेशोत्सव साजरा करावा. जबरदस्तीने कोणास वर्गणी मागू नये.

 • Ganesh mandals should use one third part of road

  सोलापूर- आपण लोकशाहीचे घटक आहोत. न्यायालयांनी दिलेल्या नियमांचे पालन करत गणेशोत्सव साजरा करावा. जबरदस्तीने कोणास वर्गणी मागू नये. शक्यतो लहान आकाराच्या, मातीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करावी. रस्त्यावरील मंडप उभारतेवेळी केवळ एक तृतीयांश भागच वापरावा. केरळची पूरपरिस्थिती लक्षात घेता सार्वजिनक मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी केले आहे.


  सोलापुरातील गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी, गणेश मूर्तिकार, शांतता समिती सदस्य आदींची संयुक्त बैठक पोलिस आयुक्तालयात गुरुवारी दुपारी घेण्यात आली. अध्यक्षस्थानी आयुक्त महादेव तांबडे होते. यावेळी महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांची प्रमुख उपस्थिती होती. पोलिस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले यांनी उपस्थितांचे स्वागत केले.


  बैठकीस प्रताप चव्हाण, दास शेळके, विजय पुकाळे, श्रीकांत घाडगे, सकलेश बाभूळगावकर, शाम कदम, उमेश मामड्याल, लक्ष्मीकांत गड्डम, लखन गायकवाड, के. डी. कांबळे, रसूल पठाण, तुकाराम मस्के, अमर कणकी, देवेंद्र भंडारे आदींसह विविध संघटनांचे १५० ते २०० पदाधिकारी उपस्थित होते.


  पोलिस विभागातील मुख्यालय उपायुक्त शशिकांत महावरकर, परिमंडळ उपायुक्त मधुकर गायकवाड, गुन्हे शाखा उपायुक्त पौर्णिमा चौगुले, एसआरपीएफ समादेशक जी.टी. मोरे, सहायक आयुक्त परशराम पाटील, सकळे, डॉ. दीपाली काळे, अभय डोंगरे, आर. एन. चोपडे, वैशाली शिंदे, रूपाली दरेकर, बी. वाय. भालचिम आदी उपस्थित होते. महापालिका विभाग नगर अभियंता संदीप कारंजे, सहायक अभियंता वाय. मुजावर, आर. एम. परदेशी, एस. एम. आवताडे, अग्निशामक दल अधीक्षक केदारनाथ आवटे, निशिकांत कांबळे, ध्वनी प्रदूषण मंडळाचे एन. एस. आवताडे, महावितरणचे डी. जी. पानपाटे, उत्तर तहसीलदार विनाेद वणठरे, होमगार्ड विभागाचे बी.पी. घाडगे, एम.एम. हत्ती, एस.व्ही. कोळी, आरटीओचे सतीश जाधव आदी उपस्थित होते.


  मनपाचा टोल फ्री क्रमांक : आरोग्य २७४०३६३ व आपत्कालीनसाठी २७४०३३५


  महापालिका देईल मंडळांना पुरस्कार
  मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवण्यात येतील. सर्व मंडळांनी मंडळ परिसराची स्वच्छता ठेवावी. कचरा निर्मूलनासाठी घंटा गाडी ठेवण्यात येईल. स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून, इतर नावीन्यपूर्ण कामे करणाऱ्या मंडळांना महापालिका पुरस्कार देईल. मनपाकडून प्रथम बक्षीस ५१ हजार, दुसरे बक्षीस २५ हजार तर तृतीय बक्षीस ११ हजार रुपये असे प्रोत्साहनपर बक्षीस उत्कृष्ट मंडळांना देण्यात येईल.
  - डॉ. अविनाश ढाकणे, आयुक्त, महापालिका


  यंदाही आॅनलाइन परवाना
  मंडळाचे पदाधिकारी निवडताना महिलांनादेखील स्थान द्यावे. शहरात सर्वधर्मीय मिळून सर्व उत्सव शांततेत साजरे करतात, ही उल्लेखनीय बाब आहे. ऑनलाइन परवाना सुविधा १०० टक्के यशस्वी झाली आहे. त्यास यंदाही प्रतिसाद द्यावा. गणेश मंडळांनी केरळमध्ये अतिवृष्टीची आपत्कालीन परिस्थितीसाठी मदत म्हणून निधी, वस्तू देण्याचे योगदान करावे.
  - महादेव तांबडे, पोलिस आयुक्त


  केरळ पूरग्रस्तांसाठी मदतीचा प्रयत्न
  केरळची पूरपरिस्थिती लक्षात घेऊन मंडळांनी मदत निधीसाठी प्रयत्न करावेत. फलक, जनजागृती साधावी. विविध ठिकाणी मूर्तिकारांच्या गणेशमूर्ती विक्रीवेळी येणाऱ्या समस्यांकडे लक्ष द्यावे. प्रबोधनासाठी मंडळांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना मांडल्या.
  - दास शेळके, ट्रस्टी अध्यक्ष, मध्यवर्ती मंडळ, सोलापूर

Trending