आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रमदानाने काढल्या विसर्जन कुंडातील मूर्ती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- गणपती आणि विष्णू घाट येथील गणेश विसर्जन कुंडातील गणेशमूर्ती शिवसेना व गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी श्रमदानातून बाहेर काढल्या. यासाठी गुरुवारी सुमारे १०० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी श्रमदान केले. शुक्रवारीही श्रमदान करण्यात येणार आहे. 


गणपती व विष्णू घाट येथील गणेश विसर्जन कुंडात महापालिकेने पाणी सोडून गणेश विसर्जनासाठी सोय केली होती. विसर्जनानंतर त्या कुंडातील पाणी वाहून तलावात गेल्याने मूर्ती अर्धवट अवस्थेत दिसू लागले होते. त्यामुळे शिवसेना व गणेश मंडळ आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गुरुवारी सकाळी श्रमदान केले. महापालिकेने डंपरच्या सहाय्याने मूर्ती नेल्या. सुमारे तीन डंपर मूर्ती निघाल्या. शुक्रवारी श्रमदान करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका झोन अधिकारी मोहन कांबळे यांनी दिली. गुरुवारी श्रमदानात नगरसेवक अमोल शिंदे, विक्रांत वानकर, शिवसेनेचे प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, मनपा प्र. नगर अभियंता संदीप कारंजे अादी उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...