घरामध्ये गणेश मूर्ती / घरामध्ये गणेश मूर्ती 1, 3, 5 विषम संख्येत नसावी, शिवलिंगाची उंची अंगठ्यापेक्षा जास्त नसावी, वाचा देवघराच्या 10 गोष्टी

Sep 11,2018 11:24:00 AM IST

घरामध्ये देवी-देवतांसाठी देवघर बनवण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. आजही अनेक लोक या प्रथेचे पालन करतात आणि देवघर बांधतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार देवघरात रोज पूजा केल्याने घरातील वातावरण पवित्र आणि सकारात्मक राहते. येथे जाणून घ्या, देवघराशी संबंधित काही खास गोष्टी...


1. घरामध्ये गणेश मूर्ती ठेवायची असल्यास 1, 3, 5 यासारख्या विषम संख्येमध्ये ठेवू नये. गणेश मूर्तींची संख्या धनात्मक म्हणजे 2, 4, 6 अशा स्वरूपात असावी.


2. शास्त्रानुसार देवघरात शिवलिंग ठेऊ नये, जर शिवलिंग असेल तर ते अंगठ्याच्या आकराएवढे असावे. कारण शिवलिंग अत्यंत संवेदनशील असते आणि यामुळे देवघरात एकच शिवलिंग ठेवणे जास्त लाभदायक आहे.


3. घरामध्ये देवघर अशाठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल. ज्या घरांमध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते, त्या घरांमधील विविध दोष आपोआप नष्ट होतात. सूर्य प्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक उर्जा नष्ट होते आणि सकारात्मक उर्जा वाढते.


4. घरामध्ये ज्या ठिकणी देवघर असेल तेथे चामड्यापासून तयार केलेल्या वस्तू, चप्पल-बूट घेऊन जाऊ नये.


5. घरातील मंदिराच्या जवळपास बाथरूम असणे अशुभ मानले जाते. त्यामुळे अशा ठिकाणांपासून देवघर दूर ठेवावे. जर एखाद्या छोट्या खोलीत देवघर असेल तर तेथे एका व्यक्तीला बसत येईल एवढी तरी जागा मोकळी सोडावी.


6. घरामध्ये देवघर असेल तर दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा करणे आवश्यक आहे. पूजा करताना घंटी अवश्य वाजवावी. तसेच संपूर्ण घरात फिरून घंटानाद करावा. असे केल्याने घंटेच्या आवाजाने नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मकता वाढते.


7. पूजेमध्ये शिळे, सुकलेले फुल-पान अर्पण करू नये. स्वच्छ आणि ताज्या पाण्याचा उपयोग करावा. या संदर्भात एक गोष्ट विशेष लक्षात ठेवावी की तुळशीचे पान आणि गंगेचे पाणी कधीही शिळे मानले जात नाही. त्यामुळे यांचा उपयोग केव्हाही केला जाऊ शकतो.


8. दररोज रात्री झोपण्यापूर्वी देवघर पडदा टाकून झाकावे. ज्याप्रकारे आपल्याला झोपल्यानंतर कोणत्याही प्रकारचा व्यत्यय आवडत नाही, ठीक त्याच भावनेने मंदिरावर पडदा टाकावा.

9. वर्षभरात जेव्हाही श्रेष्ठ मुहूर्त येतात, तेव्हा संपूर्ण घरामध्ये गोमुत्र शिंपडावे. गोमुत्र शिंपडल्याने पवित्रता कायम राहते आणि वातावरण सकारात्मक बनते. शास्त्रानुसार गोमुत्र अत्यंत चमत्कारिक प्रभाव टाकते आणि या उपायाने दैवी शक्तीची विशेष कृपा राहते.10. घरामध्ये पूजा करणार्या व्यक्तीचे तोंड पश्चिम दिशेकडे असेल तर अत्यंत शुभ राहते. यासाठी देवघरचे द्वार पूर्व दिशेला असणे आवश्यक आहे. हे शक्य नसेल तर पूजा करताना व्यक्तीचे मुख पूर्व दिशेला असल्यास शुभफळ प्राप्त होऊ शकतात.
X