आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरोदर स्त्रीने रोज श्रीगणेशासमोर बसून करावा या 1 मंत्राचा जप, बाळावर पडेल पॉझिटिव्ह प्रभाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक गरोदर महिलेला तिचे बाळ हेल्दी आणि भाग्यशाली व्हावे असे वाटते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार गरोदर महिलेने रोज 1 खास मंत्राचा जप केल्यास तिच्या होणाऱ्या बाळावर याचा सकारात्मक प्रभाव पडतो. या मंत्र जपाने गरोदर महिलेचे आरोग्यही चांगले राहते. गरोदर काळात महिला केव्हाही या मंत्राचा जप करणे सुरु करते. असा आहे मंत्र...


रक्ष रक्ष गणाध्यक्षः रक्ष त्रैलोक्य नायकः।
भक्त नाभयं कर्ता त्राताभव भवार्णवात्।।


हे आहेत मंत्र जप करण्याचे नियम
1. या मंत्राचा जप श्रीगणेशाच्या मूर्ती किंवा फोटोसमोर बसूनच करावा.


2. जप झाल्यानंतर श्रीगणेशाला मोदक किंवा मोतीचूर लाडूचा नैवेद्य दाखवावा.


3. त्यानंतर महिलेने थोडासा प्रसाद स्वतः घ्यावा आणि इतर कुटुंबातील सदस्यांना वाटावा.


4. या मंत्राचा दररोज कमीत कमी एक माळ म्हणजे 108 वेळेस जप करावा.


5. शक्य असल्यास एका  माळेपेक्षा जास्त जप करू शकता. गरोदर महिलेच्या डिलेव्हरीचा काळ जवळ आल्यानंतर जप माळेची संख्या वाढवली जाऊ शकते, यामुळे बाळंतपणात जास्त त्रास होणार नाही.


6. गरोदर काळात चंद्र किंवा सूर्यग्रहण आल्यास त्या दिवशी जप करू नये.


7. या मंत्राचा जप एकांत ठिकाणी म्हणजेच खोलीमध्ये बसून केल्यास चांगले ठरेल, कारण यामुळे एकाग्रता कायम राहते.

 

बातम्या आणखी आहेत...