पुण्याच्या धर्तीवर जळगावामध्ये / पुण्याच्या धर्तीवर जळगावामध्ये गणरायाची विसर्जन मिरवणूक; महापालिकेतील बैठकीत निर्धार

यंदापासून शेवटच्या दिवशी विसर्जनाची व्यवस्था न करता दीड दिवसाच्या गणपतीपासून संपूर्ण यंत्रणा मेहरूण तलावावर सज्ज ठेवली जाणार अाहे. पुणे येथील गणेशोत्सवाची चर्चा राज्यभर हाेत असते. त्याबराेबरीने हाेणार नसली तरी पुण्याच्या धर्तीवर विसर्जन मिरवणूक काढण्याचा निर्धार पालिकेत अायाेजित बैठकीत करण्यात अाला. या वेळी मंडळांनी विद्युत पुरवठ्यावर भार वाढेल, असे हॅलाेजन न वापरता एलईडी दिव्यांचा पर्याय स्वीकारावा, असे अावाहन करण्यात अाले.

Sep 06,2018 11:22:00 AM IST

जळगाव- यंदापासून शेवटच्या दिवशी विसर्जनाची व्यवस्था न करता दीड दिवसाच्या गणपतीपासून संपूर्ण यंत्रणा मेहरूण तलावावर सज्ज ठेवली जाणार अाहे. पुणे येथील गणेशोत्सवाची चर्चा राज्यभर हाेत असते. त्याबराेबरीने हाेणार नसली तरी पुण्याच्या धर्तीवर विसर्जन मिरवणूक काढण्याचा निर्धार पालिकेत अायाेजित बैठकीत करण्यात अाला. या वेळी मंडळांनी विद्युत पुरवठ्यावर भार वाढेल, असे हॅलाेजन न वापरता एलईडी दिव्यांचा पर्याय स्वीकारावा, असे अावाहन करण्यात अाले.


मनपा, गणेश मंडळ व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी तसेच पाेलिस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बुधवारी दुपारी ५ वाजता दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात अायाेजित करण्यात अाली हाेती. या बैठकीला अायुक्त चंद्रकांत डांगे, गणेश महामंडळाचे सचिन नारळे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंह रावळ, महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय तडवी, अास्थापना अधीक्षक सुभाष मराठे, मल्टी मीडियाचे संचालक सुशील नवाल उपस्थित होते. राेटरी मिड टाऊनतर्फे विसर्जन मिरवणुकीत मंडळाच्या कार्यकर्त्यांना थंड पाण्याचे वाटप केले जाणार असून ठिकठिकाणी स्टाॅल उभारणार असल्याचे सांगण्यात आले.


मनपाचे नियाेजन सुरू
यंदा महापालिकेच्या वतीने पाच दिवस विविध कार्यक्रमांचे अायाेजन करण्यात येणार अाहे. यात मनाेरंजनासाठी नाटकाचे अायाेजन केले जाईल. सुगमसंगीत, राज्यस्तरीय कलावंतांचे गीतगायन व नृत्याचा कार्यक्रम अायाेजित केले जातील. यासंदर्भात नियाेजन केले जात असून पालिकेचे ढाेलपथक अाकर्षण ठरणार अाहे.


मिरवणुकीवर लक्ष
मनपाच्या मानाचा गणपतीचे विसर्जननंतरही मिरवणुकीतील मंडळ पुढे सरकलेले दिसत नाहीत. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मिरवणूक चालते. हा उत्सव असून जनतेला त्याचा अानंद उपभाेगू देणे गरजेचे अाहे. गणेशभक्तांची दुपारपासूनच गर्दी हाेणार असल्याने मिरवणुकीत मंडळांनी नंबरनुसार पुढे सरकावे, यावर भर दिला जाणार अाहे.

X