आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेहरूण तलावातील गणेश विसर्जन निर्विघ्न; १८ तास चालली मिरवणूक, ५४ सार्वजनिक मंडळांचा सहभाग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहरात पारंपरिक वाद्यांच्या तालात गणरायाला रविवारी निराेप देण्यात अाला. सकाळी १०.३० वाजता निघालेल्या मुख्य मिरवणुकीची सांगता साेमवारी पहाटे साडेपाच वाजता झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शहरातील मेहरूण तलावावर जीवरक्षकांसह सुरक्षेच्या उपाययाेजना व्यापक स्वरुपात करण्यात अाल्या हाेत्या. त्यामुळे येथील विघ्नर्हता गणरायाचे विसर्जन निर्विघ्नपणे पार पडले. 


शहरातील सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीत ५४ मंडळे सहभागी झाली. ढाेल-ताशा, लेझिमच्या तालावर गणेशभक्तांनी ठेका धरला. बहुतांश मंडळांनी गुलालाएेवजी फुलांच्या पाकळ्यांची उधळण केली. १८ तास ही मिरवणूक चालली. गेल्या वर्षाच्या तुलनेत ४० मिनिटे अाधी तिची सांगता झाली. महापालिकेने यंदा प्रथमच काेल्हापूर येथील शारीरिक कसरती, युद्ध कलेचे प्रात्यक्षिक सादर करणारे पथक मागवले हाेते. महापालिकेच्या मानाच्या गणपती पाठाेपाठ सार्वजनिक गणेश मंडळांचे गणपती मिरवणुकीच्या रांगेत लागले. त्यात जनता बँक उज्ज्वल सांस्कृतिक मंडळ, नटराज गणेश मित्र मंडळ, श्रीराम तरुण सांस्कृतिक मंडळ, अाझाद क्रीडा मंडळ, शिवशक्ती क्रीडा मित्र मंडळ, युवा ब्रिगेडीअर फाउंडेशन, नेहरू चाैक गणेश मंडळ, नवीपेठ गणेश मंडळ, श्री गर्जना गणेश मंडळ, जिद्दी गणेश मंडळ, रथचाैक मित्र मंडळ, बालाजी पेठ मित्रमंडळ, शिवा गणेश मंडळासह ५४ गणेश मंडळांचा सहभाग हाेता. रात्री अकरा वाजता नवीपेठेतील श्री गर्जना मित्रमंडळाचा गणपती सर्वात शेवटी रांगेत लागला. लालशाबाबा दर्ग्यावर अामदार सुरेश भाेळे, जिल्हाधिकारी किशाेर राजेनिंबाळकर, उपमहापाैर डाॅ. अश्विन साेनवणे यांच्या हस्ते चादर चढवण्यात अाली. या वेळी अय्याज अली हे उपस्थित हाेते. 

 

  1. सायंकाळी ७ वाजता गर्दी 

गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास गर्दी केली. मिरवणूक मार्गावर सामाजिक संस्था, राजकीय पदाधिकारी व पक्षांतर्फे गणेश मंडळांचे स्वागत करण्यासाठी मंडप उभारण्यात अाले हाेते. 


महापालिकेचा मानाचा गणपती विसर्जनासाठी घेवून जाताना महापाैर सीमा भाेळे, अामदार सुरेश भाेळे, उपमहापाैर अश्विन साेनवणे, अायुक्त चंद्रकांत डांगे जिल्हाधिकारी किशाेर राजेनिंबाळकर, माजी महापाैर ललित काेल्हे. 


मिरवणुकीत मंत्री महाजनांची उपस्थिती 
नेहरू चाैक मित्र मंडळाच्या ट्रॅक्टरचे चाक दगडी बँकेजवळ पंक्चर झाले. डीवायएसपी सचिन सांगळे यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना लवकर पुढे निघण्यास सांगितले. मात्र, चाक पंक्चर असल्याने वाहन पुढे नेल्यास मूर्ती कलंडण्याची भीती असल्याने कार्यकर्त्यांचा त्याला विराेध हाेता. परिणामी अर्धातास मिरवणूक खाेळंबली. पाेलिसांच्या भूमिकेमुळे साडेचारशे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत टाॅवर चाैकातून मिरवणूक साेडून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. हे मंडळ टाॅवर चाैकातून जुन्या बसस्थानकाकडे वळले. या मार्गावर जात असताना जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना या घटनेची माहिती काही कार्यकर्त्यांनी कळवली. मंत्री महाजन हे स्वत: या ठिकाणी अाले. त्यांनी मंडळाच्या मिरवणुकीत नाचून कार्यकर्त्यांना नाराज न हाेता पुन्हा मिरवणुकीत सहभागी हाेण्याचे सांगून समजूत काढली. त्यानंतर या वादावर पडदा पडला. 


२ ठिकाणी विसर्जन व्यवस्था 
महापालिकेने यंदा विसर्जनासाठी दाेन ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था केली. गणेश घाटावर पाच फुटांपेक्षा लहान मूर्तीसाठी व सेंट टेरेसा शाळेच्या मागील बाजूला सार्वजनिक मंडळांच्या माेठ्या मूर्तीचे क्रेनने विसर्जनाची व्यवस्था हाेती. गणेश घाटाच्या विस्तीर्ण पायऱ्यांवर अनेक कुटुंब विसर्जन केल्यानंतर सेल्फी काढायचे. 


महिलांच्या लेझीम पथकात वाढ 
यंदा महिला व मुलींच्या लेझीम पथकांच्या संख्येत वाढ झाली. दरवर्षी २-३ लेझीम पथक असायचे यंदा ही संख्या ७ हाेती. शनिपेठ मित्रमंडळ, जुने गाव मित्र मंडळ, कांचननगर मित्र मंडळ, पिंप्राळा मित्रमंडळ अादी मंडळांच्या मुली व महिलांनी पारंपरिक वेशभूषेत नऊवारी साडी, फेटा परिधान करून ढाेलताशांच्या तालावर लेझीमचा ठेका घेतला. 


घरच्या घरी शाडूमातीच्या गणेशाचे विसर्जन 
'दिव्य मराठी'ने मातीच्या गणेशाचे घरीच विसर्जन हे अभियान राबवले. त्याला सकारात्मक प्रतिसाद लाभला. जळगावात हजाराे भाविकांनी यंदा शाडुमातीच्या गणेशाची स्थापना करून घरच्या घरी पाण्याची बादली, टबमध्ये काैटुंबिक वातावरणामध्ये मनाेभावे विसर्जन केले. 


ग्रामसेवक युनियनने उपलब्ध केली रुग्णवाहिका 
गणपती विसर्जन मिरवणुकीत जागाेजागी ड्युटीवर असलेले पाेलिस र्कमचारी, अधिकारी, हाेमगार्ड, वाहतूक पाेलिस, राखीव पाेलिस दलातील कर्मचारी यांच्या भाेजनाची व्यवस्था करण्यात अाली. बंॅकेच्या पदाधिकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना जागेवर जाऊन हवाबंद जेवणाचे पॅकेट व पाण्याची बाटली देण्यात अाली. सुमारे दाेन हजार फुड पाकीट यावेळी वाटप करण्यात अाले. शहर पाेलिस ठाण्यासमाेर अधीक्षक दत्तात्रय शिंदे, डीवायएसपी सचिन सांगळे, बंॅकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, संचालक सी. बी. चाैधरी, दुर्गादास नेवे, सुनिल पाटील, अनिकेत पाटील, रामेश्वर जाखेटे, एम.डी. व सीईअाे दिलीप देशमुख यांच्याहस्ते फुड पाकीटांचे वाटप करण्यात अाले. शोध आणि बचाव पथकात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग तर्फे शासकीय स्तरावर वन्यजीव संरक्षण संस्था सदस्यांचा सहभाग होता. संस्थेतर्फे ग्रामसेवक युनियनच्या माध्यमातून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली. संस्थेचे अमन गुजर यांच्यातर्फे ड्रोन कॅमेरा, वोकी टॉकी सुविधा पुरवण्यात आली. ८ जीवरक्षक जिल्हाधिकारी कार्यालय आपत्ती व्यवस्थापन विभागा कडून सुरक्षा बोटीवर तैनात हाेते. ४ सर्पमित्र जीवरक्षक म्हणून तैनात केलेले हाेते. 

बातम्या आणखी आहेत...