आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढच्‍या वर्षी लवकर या...ओझरच्‍या राजाला भावपूर्ण निरोप, ढोल-ताशाच्‍या तालावर थिरकले गणेशभक्‍त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओझर (नाशिक) - पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करत आपल्या लाडक्या बाप्पाला लाखो भक्त आज निरोप देत आहेत. गेल्या ११ दिवसांपासून मनोभावे सेवा केल्यानंतर रविवारी  (२३ सप्टेंबर) सकाळपासून नाचत-गाजत बाप्पाच्या मिरवणुकांना सुरुवात झाली. सकाळी 11 वाजता ओझरच्‍या राजाची महाआरती निफाड तहसीलदार दीपक पाटिल, मंडल अधिकारी प्रशांत तांबे, तलाठी उल्हास देशमुख व मंडळाचे पदाधिकारी यांच्या हस्ते झाली. त्‍यानंतर  विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. 


दरम्यान डीजेवरील बंदीमुळे यंदा ढोल-ताशा आणि बेंजोच्या तालावर गणेशभक्त थिरकताना दिसत होते. गणेश विसर्जनासाठी नाचत गाजत मिरवणूक निघाल्या. घरगुती गणरायाला येथील बाणगंगा नदी असलेल्या वेशीजवळील नदीकाठी, मठाजवळील बंधाऱ्यावर विसर्जन करण्यात आले, तर मोठ्या गणेश मंडळांनी पिंपळगावजवळील कादवा नदीत विसर्जन केले. यंदा मूर्तिदान संकल्पना किंवा कृत्रिम तलाव नसल्यामुळे निसर्गप्रेमींनी नाराजी व्यक्त केली. लहान मुले ‘पुढच्या वर्षी लवकर या’ च्या घोषणा देत होते. तसेच येथील विविध मित्रमंडळांनी दुपारनंतर मिरवणुकीला सुरुवात केली.


सुतार गल्लीजवळील इच्छापूर्ती गणेश मंडळाने सुरुवात केली. त्यानंतर कासार लेन मित्रमंडळाच्या मिरवणुकीस सुरुवात झाली. त्यानंतर मेनरोड येथील ओझरचा राजा मित्रमंडळाने एका पोशाखात मिरवणूक काढली. नंतर शिवाजी चौक रुपेश्वर मित्रमंडळ, वीर तानाजी चौक मानाचा राजा मित्रमंडळ, राजे शिवछत्रपती मित्रमंडळ, हिंदुहृदयसम्राट सर्कलचा इच्छामणी गणेश, महाराणा फ्रेंड सर्कल, शिंदे मळा मित्रमंडळ, संभाजी चौक मित्रमंडळ, यंगस्टार मित्रमंडळ, अमर मित्रमंडळ, कन्सारा मित्रमंडळ, मोरया फ्रेड सर्कल आदि मंडळांनी आपल्या गणरायाला निरोप दिला. 


यावेळी ओझरकरांनी गणरायावर होणारी पुष्पवृष्टी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.  डॉल्बीमुक्त करत ढोल ताशाच्या तालावर नाचत तरुणाईने बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर येण्याचं साकडं घालून भावपूर्ण निरोप दिला. यावेळी ओझर पोलिस निरीक्षक राजकुमार उपासे, सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पाटील, उपनिरीक्षक प्रकाश बोराडे, अजय कवडे, गोपनीय पोलिस कॉन्स्टेबल संतोष ब्राम्हणे, बाळासाहेब पानसारे, विश्वनाथ धारबळे, भास्कर पवार, बालकदास बैरागी, अनिल काळे, नागेश गायकवाड, अरुण गायकवाड, भूषण शिंदे, नितीन करडे, गुन्हे शोध पथकाचे अनुपम जाधव,बंडू  हेंगडे,जालिंदर चौघूले, आदी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

 

बातम्या आणखी आहेत...