आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

Ganesh Utsav : मुंबई, पुणेसह राज्यभरात गणेशोत्सवाची धूम, घरोघरी विराजमान होत आहेत बाप्पा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पुणे, मुंबईसह संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. राज्यातील घराघरांत तसेच मंडळांत गणेशाची स्थापना करण्यात येत आहे. राजकारणापासून ते चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या घरी गणेशाचे आगमन होत आहे. 13 सप्टेंबरपर्यंत हा गणेशोत्सव चालणार आहे. 

गणेशोत्सव अपडेट
> मुंबईतील प्रसिद्ध आणि नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाची आज सकाळी आरती करण्यात आली. यावेळी हजारोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती. 
> शिल्पा शेट्टी, विवेक ओबेरॉय, सोनू सूद आणि स्वप्निल जोशींच्या घरी बाप्पाचे आगमन.
> पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसह प्रमुख पाच गणपतींची आरती करण्यात आली. 
> नागपुरातील प्रसिद्ध टेकडी गणपती मंदिरात सकाळी बाप्पाची आरती करण्यात आली. 
> मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात सकाळीच गणेशाची आराधना करण्यात आली. सोबत जीएसबी सेवा गणेश मंडळात गणपतीची स्थापना करण्यात आली. 
 

गणेशाच्या स्थापनेचे शुभ मुहूर्त
> सकाळी : 09:27 ते 11:01 पर्यंत
> दुपारी : 02:15 ते 03:30 पर्यंत
> संध्याकाळी : 04:00 ते रात्री 08:05 पर्यंत 
 

सार्वजनिक गणेशोत्सवाला पुण्यात झाली होती सुरुवात
महाराष्ट्रात गणेशोत्सवाची परंपरा जुनी आहे. जिजामाता यांनी पुण्यातील कस्बा पेठे गणपतीची स्थापना केली होती. सुरुवातीला गणेशोत्सव खासगी आणि कौटुंबिक उत्सवाच्या स्वरुपात साजरा करण्यात येत होता. 1893 मध्ये लोकमान्य टिळक यांनी याला सार्वजनिक रुप देत राष्ट्रीय एकतेचे प्रतीक बनवले. 

टिळकांनी या उत्सवाद्वारे लोकांना संगठीत करण्यास सुरुवात केली. जेणेकरून त्यांच्या या संगठनाचा उपयोग स्वातंत्र लढ्यात करता येईल. 

0