आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबूकवर मैत्री करून म्हणायची, घरी कुणीच नाही ये ना! विवाहितेच्या पतीसह भावांनाही ठोकल्या बेड्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आग्रा / अलवर - सोशल मीडियावर फ्रेन्डशिप आणि डेटिंगच्या बहाण्याने केवळ महिलांची फसवणूक होते असे नाही. कित्येकवेळा बनावट सोशल मीडिया अकाउंटवरून पुरुषांचा देखील छळ केला जातो. अशा प्रकरणांमध्ये बहुतांश पीडित बदनामीच्या भीतीने समोर येत नाहीत. काही मोजक्या घटनांत लोक एफआआर दाखल करतात आणि शालिनीसारखे लोक पोलिसांच्या तावडीत सापडतात. उत्तर प्रदेशच्या आग्रा येथे राहणारी शालिनी उर्फ रचेल नावाची तरुणी आणि तिच्या अख्ख्या टोळीला उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली. वर्षभरातच तिला अटक करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी पोलिसांनी जेव्हा तिला पकडले, तेव्हा तिच्या गँगचे सदस्य पोलिसही होते. राजस्थानच्या एका युवकाने केलेल्या तक्रारीनंतर शालिनी पोलिसांच्या तावडीत सापडली. त्यानेच पोलिसांसमोर आपली आपबिती मांडली.


राजस्थानच्या युवकाला यूपीत बोलावले, मग...
राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात राहणाऱ्या एका युवकाची फेसबूकवर रचेल शर्मा नावाच्या विवाहित तरुणीशी मैत्री झाली होती. रोज होणाऱ्या चॅटिंग आणि कॉलनंतर हळू-हळू संभाषण रोमॅन्टिक होत गेले. गोड-गोड बोलून रचेलने त्या युवकाला भेटण्यासाठी बोलावले. प्रेमात वेडा झालेला युवक राजस्थान ते आग्रा पर्यंत आपली कार घेऊन पोहोचला. त्या ठिकाणी रचेल भेटली. रचेल युवकाच्या कारमध्ये बसली आणि घरी कुणीही नसल्याचे सांगून त्याला आपल्या फ्लॅटवर नेले. फ्लॅटवर पोहोचताच रचेलने रोमान्सचे नाटक सुरू केले.


अचानक येऊन धडकले पती आणि भाऊ...
तरुणाने पोलिसांना सांगितल्याप्रमाणे, फ्लॅटमधील एकूणच परिस्थिती पाहून युवकाला शंका आली होती. तरीही तो स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही. तेवढ्यात अचानक फ्लॅटमध्ये आशीष आणि आशू नावाचे दोन जण येऊन धडकले. आशीषने स्वतःला रचेलचा पती म्हणत तरुणाला मारहाण सुरू केली. तसेच आपल्या पतीवर अत्याचाराचे आरोप केले. एवढेच नव्हे, तर पोलिसांत देण्याचीही धमकी दिली. मोठ्या ड्राम्यानंतर अखेर तरुणाच्या एटीएममधून 17 हजार रुपये काढून घेतले आणि त्याच्याच कारमध्ये तरुणाला सोडून पसार झाले.


केवळ श्रीमंतांनाच करायची टार्गेट...
रचेलचे खरे नाव शालिनी सोलोमन (33) असून ती मूळची आग्रा येथील रहिवासी आहे. तिने फेसबूकवर रचेल शर्मा नावाने एक फेसबूक अकाउंट बनवले होते. स्वतःला 20-22 वर्षांची तरुणी म्हणवणाऱ्या रचेलने फेसबूकवर काही आकर्षक फोटो देखील अपलोड केले होते. प्रामुख्याने तिचे टार्गेट उच्चभ्रू घरातील युवक आणि विवाहित पुरुष होते. मग, देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात का राहत नाही. राजस्थानच्या युवकाप्रमाणेच त्याने यापूर्वीही अनेकांना टार्गेट करून लुटले होते. विशेष म्हणजे, यापूर्वी तिला अटक झाली तेव्हा तिच्या टोळीचे सदस्य दोन हवालदार होते. परंतु, आरोपींविरुद्ध सबळ पुरावे नसल्याने ते सुटले होते.