आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नातून अपहरण करून विद्यार्थिनीवर केला सामुहिक बलात्कार, तीन आरोपींना ठोकल्या बेड्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


गुमला - भरनो येथे नराधमांनी 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार केला. गावात लग्न समारंभ सुरू असताना नराधमांनी हे कुकर्म केले. पोलिसांनी या प्रकरणात 19 वर्षीय फगुवा उरांवसह दोन अल्पवयीनांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस त्यांची चौकशी करत आहेत. पीडिता इयत्ता पाचवीत शिकत आहे. 


12 मे रोजी घडली होती घटना
पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले की , '12 मे रोजी गावात एक लग्न होते. रात्री 12 ती आपल्या मैत्रिणींसोबत घरात झोपली होती. दरम्यान फगुवा उरांवने घरात शिरला आणि धमकावून घरापासून दूर नेत तिथे सामुहिक बलात्कार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली होती. भीतीपोटी ती गप्प राहिली'. यानंतर तिने आपल्या कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला. यानंतर कुटुंबीयांनी ग्रामस्थांना प्रकाराबाबत सांगितले. अगोदर गावात बैठक घेऊन प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न करण्याता आला. पण ते जमले नाही. यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांत जाऊन तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. पीडितेला वैद्यकिय तपासणीसाठी भरनो आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले होते. 
 

बातम्या आणखी आहेत...