महिलेवर सामुुहिक बलात्कार, दिवसा खोलीत डांबायचे, रात्री रेल्वे स्टेशनवर करायचे बलात्कार

दिव्य मराठी

Apr 15,2019 11:02:00 AM IST
भुसावळ - यावल तालुक्यातील बामणाेद येथील रहिवासी असलेल्या २२ वर्षीय महिलेवर पाच जणांनी अत्याचार केल्याचा जबाब पीडीतेने जीआरपी पोलिसांना दिला. त्यानुसार जीआरपीत गुन्हा दाखल झाला आहे.
बामणाेद येथील २२ वर्षीय महिला संतापाच्या भरात गुरुवारी (दि. ११) घरून निघून गेली होती. याबाबत फैजपूर पाेलिस ठाण्यात ती हरवल्याची नाेंद झाली अाहे. भुसावळ रेल्वे स्थानकावर आल्यानंतर संशयितांनी तिचे अपहरण केले. त्यानंतर ८ ते १२ एप्रिल या काळात एका खोलीत डांबून ५ जणांनी तिच्यावर अत्याचार केला, असा जबाब पीडितेने पोलिसांना दिला आहे. याप्रकरणी जीअारपी पाेलिस ठाण्यात ५ अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. दरम्यान, पीडिता घरून कधी निघाली, रेल्वे स्थानकावर केव्हा आली, अपहरण करणाऱ्या संशयितांचे वर्णन या बाबींची माहिती निरीक्षक गढरी यांनी घेतली. पीडितेने सांगितल्यानुसार रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. त्यात पीडित महिला आढळून आली आहे. त्याआधारे तपासाला गती दिली जात आहे. जीआरपीच्या सहायक पाेलिस निरीक्षक अर्चना क्षीरसागर पुढील तपास करत आहेत.
X