आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुक-बधिर महिलेवर सामुहिक बलात्कार, डोक्यात सळई मारून केली हत्या; नंतर पाण्याच्या टाकीत फेकला मृतदेह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 
मुरादाबाद (उत्तर प्रदेश) : येथे तीन नराधमांनी एका मुक्या-बहिऱ्या महिलेला आपल्या वासनेची शिकार बनवत तिच्यावर सामुहिक बलात्कार करून अत्यंत क्रुरतेने तिची हत्या केली.  हे घृणास्पद कृत्य आणि हत्या करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी मंगळवारी बेड्या ठोकल्या आहेत. 23 डिसेंबर रोजी कल्याणपूर बायपास जवळ अर्धवट बांधलेल्या फॅक्टरीमध्ये पाण्याच्या टाकीत एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला होता. 

 

ममता असे महिलेचे नाव असून ती कल्याणपूर येथील रहिवासी होती. याबाबत महिलेचा मुलगा सतिश कुमारने 24 डिसेंबर रोजी कटघर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. 

एसपी सिटी अंकित मित्तल यांनी सांगितले की, पोलिस तपासात तीन जणांचे नाव समोर आले होते. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी गोविंद सैनी, मुकूंद राम आणि रामचंद्र यांना अटक करण्यात आली आहे. 

 

आरोपींनी आपला गुन्हा मान्य केला असून 19 डिसेंबर रोजी मुक्या-बहिऱ्या महिलेला उचलून कल्याणपूर बायपासवरील एका फॅक्टरीमध्ये घेऊन गेले आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला. पण पकडल्या जाण्याच्या भीतीने तिच्या डोक्यावर सळईने वार करून तिचा खून केला. नंतर तिचा मृतदेह फॅक्टरीतील एका पाण्याच्या टाकीत फेकून दिला असल्याचे आरोपींनी चौकशी दरम्यान सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...