अल्पवयीन मुलीला पळवून / अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन नराधमांनी तिच्यावर केला सामूहिक बलात्कार, सांगलीतील घटना

  • कडेगाव येथील लॉजवर केला आळीपाळीने बलात्कार..

दिव्य मराठी वेब टीम

Jan 01,2019 06:55:00 PM IST

पुणे- तीन नराधमांनी अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सांगली जिल्ह्यातील विटा शहरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

विटा येथील एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाली होती. पोलिस बेपत्ता मुलीचा शोध घेत होते. अखेर मुलगी पोलिसांना सापडली. तिने पोलिसांना आपबिती सांगितली. पीडितेने दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी सत्यजित पवार, शुभम शिंदे आणि रितेश लोंढे या तिघांना अटक केली आहे.

कडेगाव येथील लॉजवर केला आळीपाळीने बलात्कार..

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नराधमांनी पीडित मुलीचे अपहरण करून तिला कडेगाव येथील एका लॉजवर नेले. तिथे तिच्यावर तिघांनी आळीपाळीने बलात्कार केला. ‍तिघांवर विटा पोलिसांनी अपहरण आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

X
COMMENT