आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधन : गंगा स्वच्छतेच्या मागणीसाठी 111 दिवसांपासून करत होते उपोषण, PM मोदींनाही लिहिले पत्र, पण पुढे काहीच झाले नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क, ऋषिकेश - गंगा स्वच्छतेच्या मागणीसाठी 111 दिवसांपासून उपोषणावर बसलेले पर्यावरणवादी जीडी अग्रवाल यांचे गुरुवारी निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. तब्येत बिघडल्यावर सरकारने त्यांना ऋषिकेश एम्समध्ये दाखल केले होते. त्यांना स्वामी सानंद या नावानेही ओळखले जायचे. ते गंगा स्वच्छतेसाठी विशेष कायदा तयार करण्याची मागणी करत होते.

 

असे बनले सायंटिस्ट ते संन्यासी 
जीडी अग्रवाल आयआयटी कानपूरमध्ये सिव्हिल आणि पर्यावरण इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख होते. त्यांनी राष्ट्रीय गंगा बेसिन प्राधिकरणाचे काम केले. याशिवाय केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे ते पहिले सचिवही राहिले.

 

- जीडी अग्रवाल यांनी आयआयटी रुरकीमधून सिव्हिल इंजिनिअरिंग केली. यानंतर रुड़की युनिवर्सिटीमध्येच पर्यावरण इंजिनियरिंगचे व्हिजिटिंग प्रोफेसरही राहिले. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात उत्तरप्रदेशच्या सिंचन विभागात डिझाइन इंजीनियर म्हणून केली. वाराणसीमध्ये स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराजांच्या सान्निध्यात संन्यास दीक्षा घेतली. यानंतर जी. डी. अग्रवालचे ते स्वामी ज्ञानस्वरूप सानंद बनले.

 

2008 मध्ये पहिल्यांदा उपोषण केले होते
गंगेसहित इतर नद्यांच्या स्वच्छतेसाठी जी. डी. अग्रवाल यांनी पहिल्यांदा 2008 मध्ये उपोषण केले होते. मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारांना आपले प्राण त्यागण्याची धमकीही दिली होती. जोपर्यंत सरकार नदीच्या प्रवाहावर जलविद्युत योजनांच्या निर्मितीला रद्द करण्यावर सहमत झाले नाही, तोपर्यंत त्यांनी लढा दिला.

- जुलै 2010 मध्ये तत्कालीन पर्यावरण वन आणि जलवायु परिवर्तन मंत्री जयराम रमेश यांनी व्यक्तिगतरीत्या त्यांच्याशी चर्चा करून सरकारच्या प्रतिनिधिमंडळाचे नेतृत्व केले. सोबतच, गंगेची महत्त्वपूर्ण सहायक नदी भागिरथीमध्ये धरण न बांधण्यावर सहमतीही दर्शवली.

 

2012 मध्ये सुरू केले आमरण उपोषण 
अग्रवाल 2012 मध्ये पहिल्यांदा आमरण उपोषणावर बसले होते. यादरम्यान राष्ट्रीय गंगा बेसिन प्राधिकरणाला निराधार म्हणत त्यांनी त्याच्या सदस्यतेचा राजीनामा दिला. सोबतच, इतर सदस्यांनाही असे करण्यासाठी प्रेरित केले. पर्यावरणाच्या क्षेत्रात त्यांची प्रतिष्ठा पाहता त्यांच्या प्रत्येक उपोषणाकडे गांभीर्याने पाहण्यात आले.

 

2014 मध्ये मोदी आल्यावर थांबवले उपोषण
2014 मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गंगेच्या स्वच्छतेप्रति कटिबद्धता दर्शवली होती. यानंतर जीडी अग्रवाल यांनी आमरण उपोषण संपवले होते. तथापि, सरकार बनल्यानंतर आतापर्यंत ‘नमामि गंगे’ परियोजनेचे सकारात्मक परिणाम समोर आले नाहीत. अशा वेळी अग्रवाल यांनी 22 जून 2018 रोजी हरिद्वारच्या जगजितपूर स्थित मातृसदन आश्रमात पुन्हा एकदा उपोषण सुरू केले.

 

जुलैमध्ये पोलिसांनी उपोषण स्थळापासून उचलले: 
10 जुलै 2018 रोजी पोलिसांनी अनिश्चितकालीन उपोषणावर बसलेल्या जीडी अग्रवाल यांना बळजबरी उचलले आणि एका अज्ञातस्थळी नेले. अग्रवाल यांनी याविरुद्ध उत्तराखंड उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उत्तराखंड उच्च न्यायालयाने 12 जुलै 2018 रोजी उत्तराखंडच्या मुख्य सचिवांना आदेश दिला की, जीडी अग्रवाल यांच्याशी पुढच्या 12 तासांत बैठक घेऊन योग्य समाधान काढले जावे. तरीही अचूक समाधान निघाले नाही.

 

9 ऑक्टोबरपासून जलत्याग 
सरकारने वयोवृद्ध पर्यावरणविद यांना ऋषिकेष स्थित एम्समध्ये ताब्यात घेतले. येथे डॉक्टरांनी बळजबरी करूनही त्यांनी अन्न ग्रहण केले नाही. 9 ऑक्टोबरपासून पाण्याचाही त्याग केला होता. यादरम्यान खासदार डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी त्यांना उपोषण संपवण्याचा आग्रह केला, परंतु स्वामी सानंद यांनी ते अस्वीकार केले. 

 

बातम्या आणखी आहेत...