आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर प्रदेशात प्रयागराजला गंगा-यमुना धोक्याच्या पातळीवर, १००० घरांत पाणी शिरले; मध्य प्रदेेशात चंबळने ओलांडली धोक्याची पातळी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रयागराज - उत्तर प्रदेशात प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुनेची पाणी पातळी वाढतच आहे. यामुळे खालील काही भागांत पूर आला आहे. सुमारे १०० घरांत पाणी शिरले. येथील वीजपुरवठाही बंद झाला आहे.
आवश्यक सामान घेऊन लोक सुरक्षित ठिकाणी जात आहेत. सुमारे ६०० लोकांनी ५ मदत छावण्यांत आश्रय घेतला आहे. जिल्ह्यात ३१ मदत छावण्या उभारण्यात आल्या आहेत. अनेक लोक नातेवाइकांच्या घरी गेले आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीमने बचावकार्य सुरू केले आहे. सोमवारी गंगेची पाणी पातळी फाफामऊला ८४.४४ व छतनाग येथे ८३.७० मीटर नोंदवली गेली. तसेच नैनीला यमुनेची पातळी ८४.३२ मीटरवर पोहोचली आहे. दोन्ही नद्यांचे पाणी धोक्याच्या पातळीजवळ (८४.७३ मी.) आहे.२ सेंमी प्रतितास या गतीने पाणी पातळी वाढत आहे. पुढील आठवडा नदीकाठच्या लोकांसाठी धोकादायक असू शकतो, असे प्रशासनाचेे म्हणणे आहे. इथल्या शा‌ळांना ३ दिवसांची सुटी जाहीर करण्यात आली. प्रयागराजमध्ये संसर्गजन्य रोगांचा धोका वाढल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. 
 

देशाचे हवामान : ९ राज्यांत मुुसळधार पाऊस, १९ राज्यांत इशारा जारी
> हवामान विभागानुसार सोमवारी ९ राज्यांत मुुसळधार, २ राज्यांत सामान्य, ११ राज्यांत कमी आणि ८ राज्यांत खूप कमी पाऊस झाला.
> गृह मंत्रालयाने मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानात अलर्ट जारी केला. मध्य प्रदेशात चंबळ नदी धोक्याच्या पातळीच्या ५ मीटर वरून वाहत आहे. त्यामुळे ९० गावे पुराने वेढली गेली आहेत.
> हवामान विभागाने येत्या २४ तासांत १९ राज्यांत मुुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. झारखंड, पश्चिम बंगाल व ओडिशात विजा पडण्याची शक्यता.
 
 

बातम्या आणखी आहेत...