Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | gangakhed businessman looted

गंगाखेडच्या व्यापाऱ्यास मारहाण करून लुटले, डोळ्यात मिरची टाकून 2 लाख रुपये लंपास

प्रतिनिधी | Update - Feb 22, 2019, 10:46 AM IST

गंगाखेडच्या एका व्यापाऱ्यास गुरुवारी(दि.२१) भर दिवसा चोरट्यांनी मारहाण करून दोन लाख रुपयांची रोख रक्कम लांबवली.

  • gangakhed businessman looted

    परभणी - नांदेडला व्यापारानिमित्त मोटारसायकलवर जात असलेल्या गंगाखेडच्या एका व्यापाऱ्यास गुरुवारी(दि.२१) भर दिवसा चोरट्यांनी मारहाण करून दोन लाख रुपयांची रोख रक्कम लांबवली. डोळ्यात व तोंडात मिरचीची पावडर टाकून चोरट्यांनी हा प्रकार केला.


    व्यापारी नीलेश फरकंडकर व्यापारानिमित्त नांदेड येथे मोटारसायकलने एकटेच जात होते. परभणी व नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर त्यांच्यावर पाळत ठेवून असणाऱ्या चोरट्यांनी त्यांना दुपारच्या सुमारास अडवले. डोळ्यात व तोंडात मिरचीची पावडर टाकून जबर मारहाण केली. ते एकटेच असल्याने व डोळ्यात मिरचीची पूड टाकली गेल्याने त्यांना समोरचे काहीच दिसत नव्हते. चोरट्यांनी त्यांच्या जवळील दोन लाख रुपये रक्कम घेऊन पोबारा केला. याच दरम्यान, संतोष मुरकुटे मित्रमंडळाचे अमोल दिवाण, दीपक मुरकुटे, अशोक मुरकुटे, नंदूअप्पा बलोरे, सुधाकर येवले हे लग्नानिमित्त लोहा येथे जात असताना त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी तातडीने नीलेश फरकंडकर यांना गाडीतून लोहा येथील डॉ.कानवटे यांच्याकडे उपचारासाठी नेले.

Trending