आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती कामाहून परतण्याची वाट पाहत असलेल्या चार महिन्यांच्या गर्भवती महिलेवर तिघांनी केला गँगरेप, बेशुद्धावस्थेत सोडून पळाले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - येथील  आसनसोलमध्ये पती कामावॉहून परतण्याची वाट पाहणाऱ्या महिलेवर बळजबरी करत तीन तरुणांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याचे समोर आले आहे. त्यातही आणखी वाईट बाब म्हणजे ही महिला 4 महिन्यांची गर्भवती आहे. बुधवारच्या या घटनेबाबत  पोलिसांनी उशिरा माहिती दिली आहे. 

 

आसनसोलमध्ये राहणाऱ्या या पीडित महिलेचा पती मॅकेनिक आहे. बुधवारी रात्री ही महिला घरामध्ये एकटी होती. पती कामाहून परतण्याची ती वाट पाहत होती. त्याचवेळी तीन तरुणांनी तिचा दरवाजा ठोठावला. महिलेला वाटले पती आला असेल, त्यामुळे तिने दरवाजा उघडला. पण दार उघडताच तिघेजण तिच्या घरात घुसले आणि तिला धमकावत तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. 


या तिघांनीही गर्भवती असलेल्या महिलेवर गँगरेप केला आणि पीडितेला बेशुद्धावस्थेत सोडून निघून गेले. तिचा पती परतला त्यावेळी त्याने पत्नीला बेशुद्धावस्थेत पाहिले. तिची अशी अवस्था पाहून त्याने घाईत पत्नीला हॉस्पिटलमध्ये नेले. त्यानंतर पोलिसांनाही माहिती दिली. पोलिसांनी गँगरेपचा गुन्हा दाखल केला असून महिलेने दिलेल्या माहितीनुसार आरोपी त्याच परिसरातील आहेत. मेडिकल तपासातही बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

बातम्या आणखी आहेत...