मोठे यश / 21व्या शतकातील 100 उत्कृष्ट चित्रपटांत 'गँग्ज ऑफ वासेपुर'

ब्रिटिश वृत्तपत्र 'द गार्डियन'च्या यादीत चित्रपटाला मिळाले 59 वे स्थान

Sep 16,2019 10:52:00 AM IST

ब्रिटिश वृत्तपत्र 'द गार्डियन'ने २१ व्या शतकातील जगभरातील १०० उत्कृष्ट चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. या यादीत भारतातील एकमेव चित्रपट 'गँग्ज ऑफ वासेपुर'चा समावेश केला आहे. या चित्रपटाला यादीत ५९ वे स्थान मिळाले आहे. यादीत सन २००० नंतर रिलीज झालेल्या १०० चित्रपटांचा समावेश आहे. चित्रपटातील संपूर्ण कास्ट अँड क्रू या यशामुळे खूप आनंदी आहे. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट अॅक्ट्रेस क्रिटिक्स अवॉर्ड आपल्या नावे करणारी ऋचा चड्ढा यशामुळे प्रचंड खूश आहे. ती म्हणते, : 'या चित्रपटाने भारतात तर यापूर्वीच कल्टचे स्टेटस मिळवले होते. आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही या चित्रपटाने आपली ओळख निर्माण केली आहे. चित्रपटात मला मिळालेले मोठ्या वयाचे पात्र साकारणे माझ्यासाठी आव्हानात्मक होते, परंतु वस्तुत: यामुळेच आज मी यशस्वी ठरले आहे.'


यादीतील पाच उत्कृष्ट चित्रपट
१- देयर विल वी ब्लड (२००७)
२-१२ ईयर्स अ स्लेव (२०१३)
3- बॉयहुड (२०१४)
४- अंडर द स्किन (२०१३)
५- इन द मूड फॉर लव (२०००)


कोण होते ज्युरी
पीटर ब्रैडशॉ
कॅथ क्लार्क्र
एंड्रयू पुलवर
कॅथरीन शोर्ड


स्क्रिप्ट घेऊन अनुरागकडे गेला होता झिशान
धनबादचा कोळसामाफिया आणि तेथील राजकारणावर आधारित या चित्रपटाच्या स्क्रिप्टिंगची कथा आणखीनच मजेशीर आहे. खरे म्हणजे चित्रपटाचा लेखक झिशान कादरी पाच पानांची स्क्रिप्ट घेऊन दिग्दर्शक अनुराग कश्यपकडे गेला होता. ती पाहून अनुराग म्हणाला, मी यावर चित्रपट तयार करेल, पण तुम्ही ती पूर्ण करून आणा. सुमारे एक महिन्यानंतर झिशान पुन्हा अनुरागकडे ही स्क्रिप्ट घेऊन गेला तेव्हा अनुरागने या चित्रपटावर काम सुरू केले.


झिशानची होती एक अट
यावर काम सुरू झाले तेव्हा अनुरागने झिशानलाही यामध्ये अभिनय करण्याचा सल्ला दिला. त्यावर चित्रपटामध्ये सर्वांना मारून शेवटपर्यंत जिवंत राहणाऱ्या डेफिनेटचेच पात्र साकारणार, अशी अट झिशानने ठेवली होती.


दीड महिन्याच्या फरकाने रिलीज केले दोन्ही चित्रपट
हा चित्रपट खूप लांबला होता. त्या वेळी तो दोन भागामध्ये बनवण्याचा निर्णय घेतला. दोन्ही भागांची शूटिंग एकाचवेळी केली. एक ते दीड महिन्याच्या फरकाने रिलीज केले.

X