आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
श्रीगंगानगर- अंकीत भादू हा कुख्यात गुंड पंजाबच्या एका गँगस्टरच्या एक्स गर्लफ्रेंडच्या नादात मारला गेला आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, अंकीत चंदीगढच्या सेक्टर 32मध्ये प्रेयसीला भेटायला जात होता. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी कारवाई सुरू केली. त्यानंतर त्यांनी अंकीत आणि त्याची प्रेयसी यांच्यातील मोबाइल संभाषण रेकार्ड केले. पोलिसांनी अंकीतच्या मोबाइल लोकेशनच्या मदतीने त्याचा पाठलाग करुन त्याच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवले. त्यानंतर अखेर पोलिसांनी गुरुवारी महालक्ष्मी अपार्टमेंटमध्ये सापळा रचून त्याला कंठस्नान घातले.
वडीलदेखील करत होते अंकीतचा तिरस्कार
अंकीत भादू लारेंस गँगचा प्रमुख सदस्य होता. त्याचे बालपण शेरेवाला गावात गेले. कॉलेजमध्ये शिक्षण असताना तो लारेंस गँगच्या सोपूच्या फोटोने प्रभावित झाला होता. त्यानंतर तो लारेंस गँगमध्ये सहभागी झाला होता. अंकीतवर जवळपास 22 खटले दाखल होते. त्यामुळे त्याचे वडीलही त्याचा तिरस्कार करत होते.
- अंकीत भादू, वय- 25, गुन्हे- 4 हत्या, घरफोडी- 15
- 15 फेसबुक अकाउंट आणि 20 हजार फॉलोअर
सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया
- अंकित भादूचा मृत्यू झाला नाही. वृत्तपत्रवाले खोटी बातमी पसरवत आहे.
- टेम जद आंख्यां फेर ले सै, तो शेर भी कुत्ते घेर ले सै।
- एक व्यक्ती संपूर्ण शहराला नष्ट करुन गेला. त्याचा बदला लवकरच घेतला जाईल.
रात्रभर गावात नाही पोहचला अंकीतचा मृतदेह
अंकीतचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी त्याच्या गावातील सरपंच आणि माजी सरपंच शुक्रवारी डेरा बस्सीला रवाना झाले होते. सध्या त्याचा मृतदेह डेरा बस्सीच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.