आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुख्यात गँग्स्टर एजाज लकडावाला मुंबई पोलिसांच्या तावडीत, 21 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कुख्यात गँग्स्टर एजाज लकडावाला याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, त्याला पाटणा विमानतळावरून अटक करण्यात आली होती. तसेच कोर्टात हजर केले असताना न्यायाधीशांनी एजाजला 21 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत. सह-पोलिस आयुक्त (गुन्हे शाखा) संतोष रस्तोगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, एजाज लकडावालाची मुलगी आधीच पोलिसांच्या ताब्यात होती. तिने पोलिसांना आपल्या पित्याविरुद्ध महत्वाची माहिती दिली. त्यानंतर मुंबई पोलिस सूत्रांनी लकडावाला पाटणा विमानतळावर येणार अशी गुप्त सूचना दिली. त्याच सूचनेच्या आधारे सापळा रचून आणि स्थानिक पोलिसांच्या सहकाऱ्याने लकडावाला याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

कोण आहे एजाज लकडावाला?


भारतात मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांपैकी एक एजाज लकडावाला अंडवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिमचा माजी हस्तक होता. त्याच्या विरोधात खंडणी, हत्या आणि असेच अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. दाउदच्या टोळीतून बाहेर आल्यानंतर दाउदचे हस्तक त्याच्या मागे होते. 2003 मध्ये दाउदच्या सहकाऱ्यांनी एका बॉम्बस्फोटात त्याला ठार मारल्याची चर्चा सुद्धा होती. परंतु, तो या हल्ल्यातून बचावला आणि कॅनडामधून आपले खंडणीचे उद्योग सुरूच ठेवले. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे एजाजविरुद्ध 27 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 25 एकट्या मुंबईत केलेले आहेत. या प्रकरणीच लकडावालाची सध्या कसून चौकशी केली जात आहे.बातम्या आणखी आहेत...