आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gangubai Kathiyavadi First Look| Alia Bhatt Gangu Bai Kathiyavadi| Alia Bhatt First Look

आलिया भटने शेअर केले 'गंगूबाई काठियावाडी'चे पोस्टर, चित्रपटात साकारणार मुंबईच्या लेडी डॉनची भूमिका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः संजय लीला भन्साळी यांच्या 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या आलिया भटने सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे.संजय लीला भन्साळी आणि जयंतीलाल गढा हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.


Here she is, Gangubai Kathiawadi 🌹 #SanjayLeelaBhansali @bhansali_produc @prerna982 @jayantilalgada @PenMovies #GangubaiKathiawadi pic.twitter.com/eRTFD4r9H4


आलिया भटसह या चित्रपटात आणखी कोणते कलाकार झळकणार आहेत, याची माहिती अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार अजय देवगण या चित्रपटात महत्तवाच्या भूमिकेत दिसणार असून विनोदी भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता विजय राजदेखील चित्रपटात झळकणार आहे.

हुसेन झैदी यांच्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकावर आधारित चित्रपटात डॉन गंगूबाईची कहाणी चित्रीत करण्यात आली आहे. गंगुबाई 60 च्या दशकातील मुंबई माफियांतील एक मोठे नाव होते. तिला तिच्या पतीने अवघ्या पाचशे रुपयात विकल्याचे सांगितले जाते. तेव्हापासून ती वेश्या व्यवसायात अडकली होती. गंगुबाईने असहाय्य मुलींसाठी बरीच कामेही केली होती.