आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांच्या होमटाऊनमध्ये पुन्हा गँगवॉर, भररस्त्यात एकाची निर्घृण हत्या, नुकताच जामिनावर आला होता बाहेर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होमटाऊन असलेल्या नागपूरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. पुन्हा एकदा भर रस्त्यावर एकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली आहे. गौरव उर्फ पंड्या पिल्लेवान असे हत्या झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. तो नुकताच जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता. नागपुरातील कमाल चौकात शुक्रवारी रात्री 11 वाजता तीन ते चार हल्लेखोरांनी त्याच्यावा हल्ला केला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

 

पंड्या पिल्लेवान याने केली होती तरुणाची हत्या..
मिळालेली माहिती अशी की, पंड्या पिल्लेवान याने 2016 मध्ये कमाल चौक परिसरात एका तरुणाची हत्या केली होती. त्यानंतर तो तुरुंगात होता. नुकतीच त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती. गुन्हेगार पंड्या याला कमाल चौकात बंदी घालण्यात आली होती. पंड्या याने ज्या तरुणाची हत्या केली होती, त्या तरुणाच्या नातेवाईकांनी ही मागणी केली होती. तरी देखील पंड्या पाचपावली परिसरात राजरोसपणे फिरत होता.

 

शनीचरा बाजारात आला असता पंड्यावर झाला तीक्ष शस्त्राने हल्ला
पंड्या हा शुक्रवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास शनीचरा बाजारात आला असता तीन ते चार हल्लेखोरांनी त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. या हल्ल्यात त्याचा जागेवर मृत्यू झाला. या प्रकरणी पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गौरव पिल्लेवानच्या हत्या प्रकरणी योगेश धनविजय या आरोपीला अटक केली आहे. इतर हल्लेखोर फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...