आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रवळगावात पोलिस पाटलाच्या भावाची गांजाची शेती उद्ध्वस्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

|कर्जत - रवळगाव येथील पोलिस पाटलाच्या भावाने गांजाची शेती फुलवली. पोलिसांनी रविवारी पहाटे या शेतात छापा टाकून ती उद्ध्वस्त केली. याप्रकरणी संतोष रामचंद्र खेडकर याला अटक करण्यात आली. 

 

रवळगाव शिवारातील गट नंबर ५८ मध्ये शेतकरी संतोष रामचंद्र खेडकर याने त्याच्या मालकीच्या शेतात एक एकरावर गांजाची लागवड केली होती. ही झाडे आता बहरात आली होती. कर्जत विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे यांना रवळगाव शिवारात गांजाची शेती आहे, ही माहिती समजली. त्यांनी रविवारी पहाटे पाच वाजता पोलिस पथक घेऊन रवळगाव शिवारातील या गांजाच्या शेतात छापा टाकला. तेथे एक एकर जागेत गांजाची झाडे लावलेली आहेत, हे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे सध्या पाणी टंचाई लक्षात घेऊन खेडकर याने गांजाच्या झाडांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन केले होते. तेथील सर्व झाडे पोलिसांनी जप्त केली. ती २१० किलो भरली. आज या झाडांची बाजारात किंमत १ लाख ५ हजार रुपये आहे. 
या प्रकरणी कॉन्स्टेबल अर्जुन दिंडे यांनी फिर्याद दिली. त्यावरून संतोष खेडकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास अटक करण्यात आली. रवळगाव येथील पोलिस पाटील सुनील खेडकर यांचे तो भाऊ आहे.

 

उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण व सहायक निरीक्षक एस. पी. माने यांनी हा छापा टाकला. या पथकात नाईक हृदय घोडके, कॉन्स्टेबल सागर जंगम, उध्दव शिंदे, अमोल भैलुमे, गणेश भागडे सहभागी झाले. 

बातम्या आणखी आहेत...