आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त लसणाचेच नाही तर याच्या सालीचेही आहेत खास फायदे, माहिती नसतील तुम्हाला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लसणाप्रमाणे याच्या सालींमध्येही अँटी बॅक्टेरियल, अँटी व्हायरल आणि अँटी फंगल गुणधर्म असतात. यामध्ये एलिसिन कंपाउंड असतात. जे आरोग्याला फायदेशीर आहेत. लसणाचे साल बारीक करून त्वचेवर लावल्याने अनेक फायदे होतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद, जयपूरचे सहायक प्रोफेसर डॉ. सी. आर आयदवर सांगत आहेत याचे दहा फायदे ( नोट: लसणाचे साल बारीक करून किंवा पाण्यात उकळून यूज करावे. हे जास्त दिवस फ्रिजमध्ये ठेवल्याने न्यूट्रिएंट्स कमी होतात. यामुळे ताज्या लसणाच्या सालींचा वापर फायदेशीर आहे.) 


- लसणाचे साल पाण्यात टाकून उकळून घ्या. हे पाणी कोमट करून केस धुतल्याने केसगळतीची समस्या दूर होते. 


- लसणाचे साल बारीक करून मुरुमावर लावा. यामधील अँटी बॅक्टेरियल गुणधर्म मुरुम ठीक करण्यात मदत करते. 


- लसणाचे साल पाण्यात टाकून उकळून घ्या. हे गाळून प्यायल्याने सर्दी-पडशापासून आराम मिळतो. 


- लसणाचे साल पाण्यात टाकून उकळून घ्या. हे पाणी कोमट करून त्यामध्ये पाय ठेवल्याने पायांची सूज दूर होते. 


- लसणाच्या पाकळ्या बारीक करून यामध्ये मध मिसळा. हे सकाळ-संध्याकाळ घेतल्याने दम्याचा प्रभाव कमी होतो. 


- लसणाच्या सालींची पेस्ट बनवा. यामध्ये लिंबूचा रस मिसळून केसांच्या मुळांवर लावल्याने उवा दूर होतात. 


- लसणाच्या साली एका पॅनमध्ये गरम करून पावडर बनवा. यामध्ये ऑलिव्ह ऑइल मिसळून केसांवर लावल्याने केसांचा रंग काळा होतो.

 
- याचे साल पाण्यात टाकून उकळून घ्या. हे पाणी गार करून रोपांना टाकल्याने रोप लवकर वाढते. 


- लसणाचे साल बारीक करून त्वचेवर लावल्याने दाद, खाजपासून आराम मिळतो. 

बातम्या आणखी आहेत...