आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ही 4 कामे अर्धवट सोडल्यास आयुष्यात कधीही लागत नाही सुख

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुखी आणि समृद्धशाली जीवन जगण्यासाठी शास्त्रामध्ये विविध महत्त्वपूर्ण सूत्र सांगण्यात आले आहेत. या सूत्रांचा अवलंब केल्यास आपले जीवन आनंदी राहू शकते. काही गोष्टी खूप शुल्लक असतात परंतु आपण त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शास्त्रामध्ये गरुड पुराणाचे विशेष स्थान आहे यामध्ये जीवन आणि मृत्युच्या रहस्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. आपण केलेल्या कर्माचे कोणते फळ आपल्याला मिळते हे गरुड पुराणामध्ये सांगण्यात आले आहे. या पुराणामध्ये चार कामे अशी सांगण्यात आली आहेत, जी अर्धवट सोडणे नुकसानदायक ठरू शकते. जाणून घ्या, कोणकोणती चार कामे अर्धवट सोडू नयेत.

1. गरुड पुराणानुसार ऋण किंवा उधार घेतलेले पैसे कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण परत करावेत. जर कर्ज पूर्णपणे परत केले नाही तर पुन्हा व्याजामुळे कर्जाची रक्कम वाढू लागते. अशा संकटातून बाहेर पडण्यासाठी कर्जाची रक्कम पूर्णपणे लवकर परत करावी..

2. एखादा व्यक्ती आजारी असेल तर त्याने औषधांच्या मदतीने आजार मुळापासून नष्ट करावा. जे लोक आजार ठीक झाला नसेल तरीही औषध घेणे बंद करतात त्यांना भविष्यात पुन्हा तो आजार होण्याची शक्यता असते. यामुळे आजारपणात सांगितलेले औषध पूर्णपणे घ्यावे.

3. जर तुमचा एखादा शत्रू असेल आणि वारंवार तुम्ही प्रयत्न करूनही तो शत्रुत्व संपवण्यास तयार नसेल तर त्याला कोणत्याही प्रकारे शांत करावे. कारण शत्रू नेहमीच आपले वाईट करण्याच्या हेतूने योजना आखत असतो. शत्रुत्वाचा नाश केल्यानंतरच जीवनातील भय नष्ट होते

4. एखाद्या ठिकाणी आग लागली असेल तर ती आज पूर्णपणे विझवावी. अन्यथा छोट्याश्या ठिणगीमुळे पुन्हा मोठी आग लागू शकते. यामुळे जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता असते.

गरुड पुराणाचे महत्त्व
धर्म ग्रंथांमध्ये गरुड पुराणाचे खूप महत्त्व सांगण्यात आले आहे. असे मानले जाते की, जो व्यक्ती गरुड पुराणाचे पाठ करतो त्याला विद्या,यश, सौंदर्य, लक्ष्मी, विजय आणि आरोग्य प्राप्त होते. या पुरणाचा पाठ करणाऱ्या व्यक्तीला जीवनातील सर्व रहस्य समजतात आणि तो दुःखातून मुक्त होतो.

बातम्या आणखी आहेत...