गरुड पुराण / ही 5 कामे करणाऱ्या लोकांना कधीही मिळत नाही मान-सन्मान

दरिद्री असूनही दान करणे आणि धनवान असूनही कंजूस बनून राहणाऱ्या लोकांना घर-कुटुंब आणि समाजात मान-सन्मान मिळत नाही
ही 5 कामे करणाऱ्या लोकांना कधीही मिळत नाही मान-सन्मान

रिलिजन डेस्क

Apr 28,2019 12:05:00 AM IST

आयुष्यात मान-सन्मानाचे खूप महत्त्व आहे. असेही म्हटले जाते की, ज्या व्यक्तीला घर-कुटुंब, समाजात कोणताही मान-सन्मान नसेल त्याला जिवंतपणीच मृत्युसामान त्रास सहन करावा लागतो. इतिहसात असे अनेक उदाहरण आढळून येतात, ज्यांनी मान-सन्मानासाठी स्वतःच्या जीवाचीसुद्धा आहुती दिली. याउलट काही लोक असेही असतात, ज्यांना त्यांनी केलेल्या कामांमुळे आयुष्यात कधी न कधी अपयश म्हणजे अपमानाचा सामना करावा लागतो. या कामांमुळे त्यांना मान खाली घालून जगावे लागते. गरुड पुराणामध्ये अशाच काही खास कामांबद्दल सांगण्यात आले आहे, ज्यामुळे व्यक्तीला मान खाली घावली लागते.

गरुड पुराणातील एक श्लोक
दाता दरिद्र: कृपणोर्थयुक्त: पुत्रोविधेय: कुजनस्य सेवा।
परापकारेषु नरस्य मृत्यु: प्रजायते दुश्चरितानि पञ्च।।


अर्थ - 1. दरिद्री असून दाता होणे, 2. धनवान असूनही कंजूस होणे, 3. मुलगा आज्ञाधारक नसणे, 4. दुष्ट लोकांची सेवा करणे, 5. इतरांचे अहित करताना मृत्यू होणे. या पाच कामांमुळे अपमानच सहन करावा लागतो.


दरिद्री असून दानशूर असल्याचे दाखवणे
व्यावहारिक रुपात येथे दानशूर (दाता) होण्याचा अर्थ असा आहे की, उत्पन्न कमी असूनही किंवा धनाच्या अभावामध्ये व्यर्थ पैसा करणे किंवा स्वतःचे मोठेपण दाखवण्यासाठी पैसा दान करणे किंवा मदत करणे. यामुळे जीवनात निर्वाह करणे कठीण जाते. अशा स्थितीमध्ये व्यक्ती गरजा पूर्ण करण्यासाठी चुकीच्या कामांकडे किंवा पाप कर्माकडे जाऊ शकतो.


धनवान असूनही कंजूस बनणे -
तुमच्याजवळ पुरेसे धन असूनही तुम्ही कंजूसपणा करत असाल तर तुम्हाला अपमानित व्हावे लागू शकते. विचारपूर्वक पैसा खर्च करणे चांगली गोष्ट आहे, परंतु हे गरजेपेक्षा जास्तवेळा घडले तर तुम्ही कंजूस लोकांना श्रेणीत येऊ शकता. ज्याठिकाणी जेवढा खर्च करण्याची आवश्यकता असेल तेवढ तर करावाच. जर तुम्ही तिथेही पैसा वाचवण्याचा प्रयत्न केळक तर लोक तुम्हाला कंजूस समजतील. कंजूस लोकांना आपल्या या सवयीमुळे अनेकवेळा अपमानाला सामोरे जावे लागू शकते.


मुलगा आज्ञाधारक किंवा संस्कारी नसणे -
मोठ्यांचे चुकीचे आचरण कुसंस्काराच्या स्वरुपात मुलांच्या कर्म, व्यवहार दिसून येते. यामुळे मुलांचे संगोपन चांगले कर्म आणि विचारांमध्येच करावे. असे न केल्यास पुरुषार्थाने प्राप्त केलेल्या प्रतिष्टा, मन-सन्मानाची हानी कोणत्याही क्षणी होऊ शकते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन गोष्टींविषयी...

दुष्ट किंवा दुर्जनांची सेवा - चांगल्या किंवा वाईट संगतीचा प्रभाव जीवनावर पडत असतो. यामुळे दुष्ट, दुर्जन लोकांची संगत, सेवा निश्चितपणे तुम्हाला अपराधी किंवा पापी लोकांमध्ये सहभागी करून शेवटी अपयशाचा भागीदार बनवू शकते.इतरांचे अहित करताना मृत्यू होणे - स्वार्थ साधण्यासाठी किंवा हेतुपूर्व इतरांचे शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक अहित करताना मृत्यू येणे. त्या वाईट कर्मांना दर्शवतो जो तुमच्यासोबत कुटुंबियांच्याही अपयश आणि उपेक्षाचे करण ठरते.
X
COMMENT