Home | Jeevan Mantra | Dharm | garuda purana health tips in marathi

ग्रंथांमध्येही सांगण्यात आले आहे निरोगी शरीराचे रहस्य, या 6 गोष्टींकडे द्यावे लक्ष

रिलिजन डेस्क | Update - Nov 09, 2018, 12:03 AM IST

आजारपणाचे हे आहेत 6 कारण, याकडे लक्ष दिल्यास राहाल निरोगी

 • garuda purana health tips in marathi

  गरुड पुराणमध्ये अशी 6 कारणे सांगितली आहेत ज्यामुळे आपण आजारी पडू शकतो. जर या गोष्टींकडे लक्ष ठेवले तर तुम्ही जास्त काळ निरोगी राहू शकता. जाणुन घ्या गरुड पुराणात सांगितलेल्या आजारांचे 6 कारण कोणते.


  अत्यम्बुपानं कठिनाशनं च, धातुक्षयो वेगविधापणं च।
  दिवाशयो जागरणं च रात्रौ, षड्भिर्नराणा प्रभवन्ति रोगाः।।


  गरजेपेक्षा जास्त पाणी पिने
  तसे तर पाणी पिने शरीरासाठी चांगले मानले जाते. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने पोटासंबंधीत अनेक रोगांपासुन दूर राहता येते. परंतु गरजेपेक्षा जास्त पाणी पिने तुम्हाला हाणी पोहोचवू शकते. गरुड पुराणाप्रमाणे जो मनुष्य शरीराच्या गरजेपेक्षा जास्त पाणी पितो त्याला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. यामुळे शरीराची गरज ओळखा आणि आवश्यक तेवढेच पाणी प्या.


  दबाव आल्यावर देखील नित्यक्रिया थांबवणे
  नित्यक्रिया आजारांना दूर ठेवण्याची एक सोपी पध्दत आहे. जो मनुष्य सकाळच्या सुरुवातीला नित्यकर्मांचे पालन करतो तो जास्त निरोगी राहतो. जो दबाव आल्यावर देखील नित्यक्रिया थांबवतो त्याला आजार होण्याची शक्यता असते. यामुळे नित्यकर्मांना कधीच थांबवु नये.


  दिवसा झोपणे
  दिवसा झोपणे आजारांचे सर्वात मोठे कारण मानले जाते. दिवसा झोपणारा मनुष्य आळशी मानला जातो. दिवसा झोपणे म्हणजे लोक आराम करण्याचा मार्ग मानतात, परंतु ही सवय आराम नाही तर आजार देते. यामुळे लक्षात ठेवा की, ही सवय तुम्हाला लागु नये आणि लागलीच तर लवकर मोडा.


  जड भोजण करणे
  जेवणात सर्व व्हिटॅमिन आणि प्रोटीन आवश्यक असतात. परंतु यामध्येही सावधता बाळगणे खुप आवश्यक असते. वारंवार जड भोजन करणे शरीरासाठी खुप हाणीकारक असते. निरोगी राहण्यासाठी सकाळचा नाष्टा करावा आणि मग व्हिटॅमिन आणि प्रोटीनयुक्त लंच करावा. रात्री मसालेदार किंवा जड अन्न खाणे टाळले पाहिजे. असे केल्याने तुम्ही दिर्घकाळ निरोगी राहू शकता.


  पुढील स्लाईडवर वाचा आजाराचे अन्य 2 कारणे...

 • garuda purana health tips in marathi

  रात्री जागणे
  अनेक लोकांना रात्री उशीरापर्यंत जागण्याची सवय असते. ज्या प्रमाणे दिवसा झोपणे हाणीकारक आहे त्याच प्रकारे रात्री जागणे देखील खुप घातक असते. प्रत्येक कामासाठी निश्चित वेळ असते. ती त्याच वेळी केली पाहिजे. रात्री उशीरापर्यंत जागल्याने तुम्हाला अनेक प्रकारचे आजार होऊ शकता.

 • garuda purana health tips in marathi

  इन्युनिटी पॉवर संपणे
  शरीरातील आजारांसोबत लढण्याच्या ताकदीला इन्युनिटी पॉवर म्हणतात. ज्या मनुष्याची इन्युनिटी पॉवर खुप कमी असेल तो जास्त आजारी असतो. कोणाचीही इन्युनिटी पॉवर त्याची दिनचर्या आणि सवयींवर अवलंबून असते. जो मनुष्य नियमित वेळेवर उठतो व्यायम करतो, योग्य वेळेवर जेवण करतो आणि झोपतो, त्याची इन्युनिटी पॉवर खुप चांगली असते आणि तो निरोगी राहतो. यामुळे प्रयत्न करा की, तुमची दिनचर्या योग्य राहिल आणि तुमची इन्युनिटी पॉवर चांगली राहील.

Trending