आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या कंपनीने लॉन्च केले आपले इलेक्ट्रिक स्कूटर, फक्त 20 पैसे प्रति किमी येतो खर्च

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली : गर्वित ई-बाइकने अलीकडेच दिल्लीत इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. या स्कूटरला 80 किलोमीटर प्रति तास वेगाने चालविण्यासाठी 20 पैसे प्रति किलोमीटर खर्च येणार आहे. कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ई-बाइकगो लवकरच शहरातील लोकांसाठी काम सुरू करेल, जेणेकरून लोक वाहतूकीसाठी इलेक्ट्रिक स्कूटरचा वापर करावा आणि ट्रॅफीक तसेच प्रदूषण कमी करण्यास मदत करतील. 

 
लिथियम आयन बॅटरींचा वापर 
कंपनीचे संस्थापक डॉ. इरफान खान यांनी सांगितले की, आम्हाला संपूर्ण भारतात आमचे काम वाढवायचे आहे. कारण भारतातील लोक वाहतूकीसाठी पर्यावरणपूरक साधनांचा स्वीकार करावा आणि आधुनिक भारतीयांच्या जीवनातील प्रवास परवडण्यायोग्य आणि सक्षम असावा हीच आमची इच्छा आहे.  या बाइकमध्ये लिथियम आयन (लियॉन) बॅटरींचा वापर करण्यात आला आहे. ही बॅटरी पर्यावरण पूरक असून धोकादायक असणारा इलेक्ट्रॉनिक कचरा कमी करण्यास कमी करतात. 


20 रूपयांनी मिळणार किरायावर
या स्कूटरला 80 किलोमीटर प्रति तास वेगाने चालविण्यासाठी 20 पैसे प्रति किलोमीटर खर्च येतो. यामुळे ईबाइकगो किमान 30 मिनिटासाठी 20 रूपये दराने भाडेतत्वावर देण्यात येणार असल्याचे डॉ.इरफान खान यांनी सांगितले. 

 

दिल्लीपेक्षा मुंबईचे प्रदूषण कमी

दिल्ली शहराचे वाढते प्रदूषण लोकांसाठी एक समस्या बनली आहे. कारण प्रदूषणचा स्तर गंभीर स्थितीपेक्षाही वाढला आहे. दिवाळीनंतर हा स्तर 40 टक्क्यांपेक्षाही जास्त आहे. तसेच याला कमी करण्यसाठी ठोस प्रयत्न करण्यात आले नाही. खान यांना सांगितले की, दिल्लीची लोकसंख्या बंगळुरुपेक्षा 65 पटीने जास्त आहे. पण दिल्लीतील प्रदूषण बंगळुरुपेक्षा 600 पटीने अधिक आहे. सर्वाधिक लोकसंख्येच्याबाबतीत मुंबई शहर जगातील चौथ्या क्रमांकाचे शहर आहे. पण येथील प्रदूषण दिल्लीपेक्षा 70 पटीने कमी आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी बंगळुरुने केलेल्या उपया योजनांचा दिल्लीने देखील अवलंब करणे गरजेचे आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...